...अखेर जळगावधील सभा रद्द, सुषमा अंधारे पुण्याकडे रवाना, कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी
Jalgaon News Update : जळगावमध्ये आज सुषमा अंधारे यांची सभा होती. परंतु, त्यांच्या सभेला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सभा घेण्यावर सुषमा अंधारे ठाम होत्या. त्यामुळे त्यांना नजर कैद करण्यात आले होते.
जळगाव : महाप्रबोधन यात्रे निमित्त जळगावमध्ये होणरी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची सभा रद्द झाली आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे पुण्याकडे रवाना झाल्या आहेत. भव्य पुष्पवृष्टी करून सुषमा अंधारे यांना कार्यकर्त्यांनी निरोप दिला. सभेला परवानगी नाकारल्यानंतर देखील सभा घेणारच या भूमिकेवर सुषमा अंधारे ठाम होत्या. त्यामुळे त्यांना जळगावमध्येच नजर कैद करण्यात आले होते. यामुळे सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.
महाप्रबोधन यात्रेची मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेवरून जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय. अनेक घडामोडीनंतर सुषमा अंधारे यांची मुक्ताईनगरची सभा होणार नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या खासगी वाहनाने पुण्याकडे रवाना झाल्या. त्या पूर्वी त्यांच्यावर भव्य अशी पुष्पपृष्टी करण्यात आली. ज्या पद्धतीने सुरुवात जोरदार झाली होती, त्याचा शेवटही गोड व्हावा म्हणून सुषमा अंधारे यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी पुष्पपृष्टी केली.
सुषमा अंधारे यांच्या जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात झालेल्या सभांमुळे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगावमध्ये आज सुषमा अंधारे यांची सभा होती. परंतु, त्यांच्या सभेला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सभा घेण्यावर सुषमा अंधारे ठाम होत्या. त्यामुळे त्यांना नजर कैद करण्यात आले होते. सुषमा अंधारे यांना पोलिसांनी जळगावमधील हॉटेल के पी प्राईडमध्ये नजर कैद केले होते. मुक्ताईनगर येथे महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतरही सभा घेणारच असा पवित्रा ठाकरे गटाने घेतल्याने जळगाव वरून मुक्ताईनगरकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजरकैद केले. साध्या वेशाततील पोलिस आणि महिला पोलिसांचा हॉटेलबाहेर गराडा होता. पोलिसांच्या कारवाई नंतर ऑनलाईन सभा घेण्याची शक्यता होती. परंतु, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सभा झाल्या नाहीत.
सुषमा अंधारे आक्रमक
प्रथम सभेला परवानगी नाकारली आणि त्यानंतर नजर कैद करण्यात आले. त्यामुळे सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. "मी काही आतंकवादी नाही किंवा दहशतवादी नाही. पोलिस मला जीवे तर मारणार नाहीत ना? खासगी मालमत्ता असलेल्या ठिकाणीही 300 ते 400 पोलिसांचा गराडा पडलेला आहे. मी संविधानिक विचार मांडते, तरीही तुम्ही घाबरता कशाला? असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी सरकारच्या या कारभारावर ताशेरे ओडले. मी जळगाव जिल्ह्यातले प्रश्न मांडत असेल तर माझा जीव घेणार का? मी सर्व गोष्टींना तयार असल्याचा इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी सरकारला दिला.
महत्वाच्या बातम्या