एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील माकडांना शेपट्या आपटत नाचायची गरज नव्हती; महाराष्ट्रातील हिंसाचारावर सामनातून टिकास्त्र

Maharashtra Violence : त्रिपुरातील घटनांचे महाराष्ट्रात पडसाद उमटावेत व त्यातून जाळपोळ, हिंसाचार घडावा हे चिंताजनक आहे, सामना अग्रलेखातून चिंता व्यक्त.

Maharashtra Violence : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसा आणि जाळपोळीबाबत आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून आरोपही लावण्यात आला आहेत. तसेच, महाराष्ट्रात दंगली, हिंसाचार घडविण्याइतके बळ रझा अकादमीचे नाही, पण त्या मौलवींच्या खांद्यावर बंदुका ठेवून दुसरेच कोणी महाराष्ट्राचे वातावरण नासवत आहे काय?, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. 

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, "त्रिपुरा प्रकरणात रझा अकादमीचीच महाराष्ट्रात 'बांगबाजी' सुरू झाली आहे. महाराष्ट्रात दंगली, हिंसाचार घडविण्याइतके बळ रझा अकादमीचे नाही, पण त्या मौलवींच्या खांद्यावर बंदुका ठेवून दुसरेच कोणी महाराष्ट्राचे वातावरण नासवत आहे काय? त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळण्यात आली नाही असे त्रिपुराचे सरकार म्हणते. ते खरे मानले तरी प्रश्न निर्माण होतो तो असा की, बांगलादेशातील घटनेवरून त्रिपुरात मोर्चे काढण्याचे कारण काय? आणि शेवटचा ताजा कलम असा की, ज्यांनी त्रिपुरात मोर्चे काढून वातावरण बिघडविले, त्यांना बाजूच्या मणिपुरातील घटनांचे सोयरसुतक का असू नये? मणिपुरात दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला करून कर्नल अनुज, त्यांची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलास ठार केले. चार जवानही त्या हल्ल्यात शहीद झाले. या घटनेचा निषेध करून मोर्चा काढावा असे कोणाला का वाटू नये?"

"त्रिपुरातील घटनांचे महाराष्ट्रात पडसाद उमटावेत व त्यातून जाळपोळ, हिंसाचार घडावा हे चिंताजनक आहे. मराठवाड्यातील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या, पण अमरावती शहरात चार दिवसांची संचारबंदी लागू करावी लागली, इतके प्रकरण हाताबाहेर गेले. परिस्थिती आता नियंत्रणात आहे असे सरकारतर्फे सांगण्यात आले, पण मुळात परिस्थिती हाताबाहेर का गेली? हा प्रश्न आहे." , असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

वाचा सामानाचा अग्रलेख : त्रिपुरात तुरी! महाराष्ट्रात रझाकारी!!

त्रिपुरा प्रकरणात रझा अकादमीचीच महाराष्ट्रात 'बांगबाजी' सुरू झाली आहे. महाराष्ट्रात दंगली, हिंसाचार घडविण्याइतके बळ रझा अकादमीचे नाही, पण त्या मौलवींच्या खांद्यावर बंदुका ठेवून दुसरेच कोणी महाराष्ट्राचे वातावरण नासवत आहे काय?

त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळण्यात आली नाही असे त्रिपुराचे सरकार म्हणते. ते खरे मानले तरी प्रश्न निर्माण होतो तो असा की, बांगलादेशातील घटनेवरून त्रिपुरात मोर्चे काढण्याचे कारण काय? आणि शेवटचा ताजा कलम असा की, ज्यांनी त्रिपुरात मोर्चे काढून वातावरण बिघडविले, त्यांना बाजूच्या मणिपुरातील घटनांचे सोयरसुतक का असू नये? मणिपुरात दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला करून कर्नल अनुज, त्यांची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलास ठार केले. चार जवानही त्या हल्ल्यात शहीद झाले. या घटनेचा निषेध करून मोर्चा काढावा असे कोणाला का वाटू नये?

त्रिपुरातील घटनांचे महाराष्ट्रात पडसाद उमटावेत व त्यातून जाळपोळ, हिंसाचार घडावा हे चिंताजनक आहे. मराठवाड्या तील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या, पण अमरावती शहरात चार दिवसांची संचारबंदी लागू करावी लागली, इतके प्रकरण हाताबाहेर गेले. परिस्थिती आता नियंत्रणात आहे असे सरकारतर्फे सांगण्यात आले, पण मुळात परिस्थिती हाताबाहेर का गेली? हा प्रश्न आहे. त्रिपुरा कुठे आणि महाराष्ट्र कुठे? पण त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटावेत हे शंकास्पद आहे. मुळात त्रिपुरात नेमके काय घडले, कशामुळे, कोणामुळे घडले हेदेखील कोणी धड सांगू शकले नाही. त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील एमआयएम, रझा अकादमी नामक टोळय़ांनी आंदोलन सुरू केले. त्यास हिंसक वळण लागले. आता त्रिपुरात मशिदीवर हल्ले किंवा तणावाचे वातावरण का निर्माण झाले, तर बांगलादेशात हिंदूंवर हल्ले झाले. त्याचा धिक्कार करण्यासाठी त्रिपुरात हिंदू संघटनांनी निषेधाचे मोर्चे काढले, त्यातून हिंदू-मुसलमानांत तणाव वाढला. हे सर्व त्रिपुरात घडले. महाराष्ट्रातील किती मुसलमानांना त्रिपुरा हे राज्य माहीत आहे? तशी शंकाच आहे. त्रिपुराचे सरकार किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेथे काय घडले ते पाहून घेतील. महाराष्ट्रातील माकडांना शेपटय़ा आपटत नाचायची गरज नव्हती. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाज असुरक्षित असेल तर त्यांना संरक्षण देण्याचे काम मोदी सरकारचे आहे. यासंदर्भात बांगलादेशच्या पंतप्रधानांकडे निषेध करण्याची भूमिका पंतप्रधान मोदी घेतील. बांगलादेशातील हिंदू समाजावर तेथे सातत्याने हल्ले होत आहेत म्हणून फक्त त्रिपुरात मोर्चे काढण्याचे प्रयोजन काय? सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन दिल्लीत मोर्चा काढायला हवा व मोदी सरकारला जाब विचारायला हवा. उत्तर प्रदेशसह चार-पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसा देशातील हिंदू खतऱ्यात येऊ लागला आहे असे भाजपवाल्यांनी निर्माण केलेल्या नकली हिंदुत्ववादी संघटनांना वाटू लागले आहे. हे आता नित्याचेच झाले आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही हिंदू खतऱ्यात आल्याची आरोळी ठोकण्यात आली होती आणि तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदुत्वाच्या मारेकरी असल्याचा प्रचार करण्यात आला होता, पण झाले काय, तर पश्चिम बंगालातील समस्त हिंदू समाजाने भाजपचा दारुण पराभव केला व ममतांना पाठिंबा दिला. त्यामुळे प्रत्येक वेळी 'लांडगा आला रे।।।'च्या धर्तीवर 'हिंदू खतऱ्यात आला हो।।।' असे ओरडता येणार नाही आणि हिंदू खरेच खतऱ्यात आला असेल तर ते हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारचे अपयश आहे. त्याबद्दल जगभरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्लीत जमून एक गोलमेज परिषद सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली घेतली पाहिजे. तसे कोणी करणार आहे काय? तसे काहीच न करता त्रिपुरासारख्या राज्यात तणाव घडवून संपूर्ण देशात असंतोष निर्माण करण्याचे उद्योग केले जात आहेत. बांगलादेशातील हिंदू मारला जात आहे, त्याची चिंता फक्त त्रिपुरातच व्यक्त का होत आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात, हरयाणात, बिहारात हिंदूंना संताप येत नाही काय? पण त्रिपुरात ठिणग्या टाकण्याचे मुख्य कारण असे की, त्रिपुरा या ईशान्येकडील छोटय़ा राज्यात आज भाजपचे शासन असले तरी ते सरकार अपयशी ठरले आहे. त्याची लोकप्रियता घटली आहे. बाजूच्या प. बंगालचा प्रभाव त्रिपुरावर पडला असून ममता बॅनर्जी यांनी त्रिपुरात लक्ष घातल्याने भाजपच्या सत्तेला धक्के बसू लागले आहेत. त्रिपुराच्या काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी तृणमूल पक्षात प्रवेश करताच त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करून ममता बॅनर्जी यांनी 'त्रिपुरा'तील जनतेची मने जिंकली. आता त्रिपुराची जनता भाजपकडून निघून जाते आहे असे दिसताच तेथे परंपरेप्रमाणे धार्मिक भडका उडविण्यात येत आहे. त्रिपुरातील हिंसाचारात पोलीस जखमी झाले, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्रिपुरा हे ईशान्येकडचे व देशाच्या सीमेवरील राज्य असल्याने चिंता वाटते, पण केंद्र सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य आहे काय? त्यांच्यासाठी त्रिपुरा हे एक राज्य आहे व तेथे भाजपचीच सत्ता राहावी हा त्यांचा अट्टहास अहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंची चिंता भाजपप्रणीत हिंदुत्ववादी संघटनांना वाटत असेल तर बरेच आहे, पण गेल्या काही काळापासून कश्मिरी हिंदू पंडितांचे हत्यासत्र सुरु आहे. त्या पंडितांचा आक्रोश ऐकून या मंडळींचे मन द्रवत कसे नाही? हे रक्त तर आपल्याच भूमीवर सांडत आहे, पण त्यावर ना कोणी भूमिका घेत ना कुठे धिक्काराचे मोर्चे निघताना दिसत आहेत. त्रिपुराच्या प्रयोगशाळेत मात्र नवे प्रयोग सुरू झाले आहेत. पुन्हा त्रिपुरातील प्रयोगाची स्फोटके महाराष्ट्रातच का उडावीत? रझा अकादमी वगैरे संघटना या काही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, पण जगात मुसलमानांच्या बाबतीत कुठे काय वाजले की, हे लोक मुंबई-महाराष्ट्रात छाती पिटतात. त्यांना कोणीतरी पाठीमागून बळ पुरवायचे काम करतात व ते 'बळ' कोण पुरवते ते अमरावतीच्या दंगलीत दिसू लागले. रझा अकादमी ही सुन्नी विद्वानांची सांस्कृतिक संघटना आहे असे म्हणतात, पण त्यांचे साहित्य, सांस्कृतिक कार्य कमी व इतरच उद्योग अलीकडे जास्त दिसू लागले आहेत. मुंबईतील आझाद मैदान दंगल ते अमरावतीचा हिंसाचार असा रझा अकादमीचा प्रवास सांस्कृतिक मार्गावरून नक्कीच झालेला नाही. ते फतवेही जारी करतात. म्यानमार, आसाम दंगलीचे पडसाद मुंबईत उमटविण्यात रझा अकादमीचा हात असल्याचे पुरावे समोर आले होते. आता त्रिपुरा प्रकरणात रझा अकादमीचीच महाराष्ट्रात 'बांगबाजी' सुरू झाली आहे. महाराष्ट्रात दंगली, हिंसाचार घडविण्याइतके बळ रझा अकादमीचे नाही, पण त्या मौलवींच्या खांद्यावर बंदुका ठेवून दुसरेच कोणी महाराष्ट्राचे वातावरण नासवत आहे काय? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक शहाणपणाचे विधान केले आहे. ते म्हणतात, त्रिपुरात न घडलेल्या घटनांवर राज्यात मोर्चे काढण्यात आले. हे एक सुनियोजित षड्यंत्र आहे. त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळण्यात आली नाही असे त्रिपुराचे सरकार म्हणते. ते खरे मानले तरी प्रश्न निर्माण होतो तो असा की, बांगलादेशातील घटनेवरून त्रिपुरात मोर्चे काढण्याचे कारण काय? मोर्चेकरी हिंसक झाले तरी तेथील सरकार थंड का बसले? आणि शेवटचा ताजा कलम असा की, ज्यांनी त्रिपुरात मोर्चे काढून वातावरण बिघडविले, त्यांना बाजूच्या मणिपुरातील घटनांचे सोयरसुतक का असू नये? मणिपुरात दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला करून कर्नल अनुज, त्यांची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलास ठार केले. चार जवानही त्या हल्ल्यात शहीद झाले. या घटनेचा निषेध करून मोर्चा काढावा असे कोणाला का वाटू नये? एकंदरीत सगळाच गोंधळ दिसत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget