एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने, तिकीट कापण्यात आलेल्या माजी खासदारांना संधी

सर्व्हेच्या नावाखाली ज्या खासदारांचे तिकीट कापण्यात आलं होतं त्यांना संधी देण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. आता भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची संधी देण्यात आली आहे. 

मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आला आहे. विधानपरिषदेसाठी भावना गवळी (Bhavana Gawali) आणि कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

भाजपने त्यांच्या पाच नावांची घोषणा केल्यानंतर आता शिंदे गटाकडूनही दोन नावांची घोषणा करण्यात आली. शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. भावना गवळी या पाच वेळेच्या खासदार असून त्यांना यावेळच्या लोकसभेसाठी तिकीट नाकारलं होतं. तर कृपाल तुमाने  रामटेकमधून दोन वेळा निवडून आलेले होते. त्यांनाही तिकीट नाकारून त्या ठिकाणी भाजपच्या राजू पारवे यांना संधी देण्यात आली होती.  

भावना गवळी यांना संधी दिल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत यवतमाळ आणि वाशिम सह आजूबाजूच्या परिसरात शिंदे गटाला फायदा होणार असल्याची चर्चा आहे. 

तिकीट कापलेल्या खासदारांना संधी

कृपाल तुमाने हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळचे खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी कापली होती. त्या ठिकाणी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. रामटेकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. पण तिकीट कापलेल्या कृपाल तुमाने यांना एकनाथ शिंदेंनी आता विधानपरिषदेची संधी दिली आहे. 

तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी या यावेळीही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होत्या. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा असताना भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे त्याचं तिकीट कापण्यात आलं आणि ते हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं. या ठिकाणीही महायुतीच्या उमेदवारला पराभवाचा धक्का बसला आहे. 

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी? 

पंकजा मुंडे
योगेश टिळेकर
परिणय फुके 
अमित गोरखे
सदाभाऊ खोत

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget