एक्स्प्लोर

Shiv Jayanti 2022 : 'महाराष्ट्रात सुराज्य व्हावं, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु', राज ठाकरेंनी दिलेल्या शपथेमध्ये नेमकं काय?

आज राज्यात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शपथ दिली.

Shiv Jayanti 2022 : तिथीप्रमाणे आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती साजरी केली जात आहे. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी जमलेल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शपथ दिली आहे. या शपथेमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं ते पाहुयात...

राज ठाकरेंनी दिलेल्या शपथेत नेमकं काय?

आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्यची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करु. हे सुराज्य स्थापन करताना जाती-जातींमध्ये हरवलेला समाज, पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहिल, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मूल शाळेत जाऊन शिकत असेल, लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल. इथली शहरं, गावं, पाडे, तांडे सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल. आमच्या शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल. त्यासाठी जे पडेल ते करु. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी, स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत, याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माची एकनिष्ठता व्यक्त करतो. असा मजकूर राज ठाकरे यांनी दिलेल्या शपथेमध्ये आहे.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी अभिषेक आणि पूजन केले. यावेळी शिवनेरीवर मोठा जल्लोष करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात शिवाजी माहाराजांच्या नावाचा जयघोष यावेळी करण्यात आला.
 
महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget