Shiv Jayanti 2022 : औरंगाबादमध्ये शिवरायांच्या देशातील सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण; क्रांती चौक उजळून निघाला
Shiv Jayanti 2022 : देशातील सर्वाधिक उंचीचा शिवाजी महाराजांच्या पुतळा औरंगाबादच्या (Aurangabad) क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी नामांकित 15 ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन महाशिववादनही केलं
Shiv Jayanti 2022 : देशातील सर्वाधिक उंचीचा शिवाजी महाराजांच्या पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. काल रात्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता. या सोहळ्यासाठी शहरातील नामांकित 15 ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन महाशिववादनही केलं. शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बसवण्यात आल्यानं औरंगाबादकरांमध्येही यावेळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या सोहळ्यासाठी औरंगाबादकरांनी क्रांती चौकात एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे चंद्रकात खैरे, बाळासाहेब थोरात, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
Sangli Shiv Jayanti 2022 :सांगलीत शिवजन्म सोहळा संपन्न , सोहळ्यावेळी विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी
सांगली मध्ये मारुती चौकात विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या ठिकाणी शिवजन्म सोहळा शिवप्रेमींनी साजरा केला. मध्यरात्री 12 वाजता हा शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी छत्रपतीच्या पुतळा भोवती आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या शिवजन्म सोहळयास मोठया संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी पोवाडा आणि छत्रपती शिवाजी महाराज याचा नामकरण सोहळा मोठया उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला.
solapur Shiv Jayanti 2022: सोलापुरात देखील शिवजन्मोत्सवाचा उत्साह, आकर्षक फुलांची सजावट
solapur Shiv Jayanti 2022: सोलापुरात देखील शिवजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. रात्री 12 वाजता सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी महाराजांना अभिवादन केलं. महाराजांचा जयघोष करत शेकडो तरुणांनी यावेळी अभिवादन केलं. रात्री 12.30 पर्यंत महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पोलिसांनी आवाहन करून तरुणांना शांततेत घरी परतण्याची विनंती यावेळी केली. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे.'
Beed Shiv Jayanti 2022: बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती रोषणाई
Beed Shiv Jayanti 2022: रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव.. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती रोषणाई. रात्री बरोबर बारा वाजता बीडकरांनी मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. फटाक्यांची आतिषबाजी सोबत लेझर शो यामुळे बीड शहरातील जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. तडफदार पोवाडा आणि त्याच पोवाडावर लेझर शोची रंगसंगती यामुळे हा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीनिमित्त शिवरायांवर आधारित 'हे' सिनेमे पाहायलाच हवे