Shiv Jayanti LIVE : राज्यात तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह; शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 Maharashtra :आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे.
LIVE
Background
Shivjayanti 2022 In Mumbai Maharashtra : 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आता आज 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाणार आहे. दरम्यान राज्यभरातील शिवभक्तांचा उत्साह अगदी गगनात मावेनासा झाला आहे. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी होणार असल्याचं सांगण्यात आलं असून अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यावेळी छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेनं जय्यत तयारी केलीय. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करत आहे. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.
मनसेकडून अशी साजरी होणार शिवजयंती
:- प्रत्येक विभागात शिवजयंती साजरी होणार
:- दादरमध्ये महिलांची रॅली निघणार
:- मुंबईभरातले मनसैनिक पार्कात एकवटणार
:- राज ठाकरे सहकुटुंब पार्कात उपस्थित राहणार
:- विभागवार शिवजयंतीचे रथयात्रा निघणार आहेत
महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे अभिषेक आणि पूजन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परिसरात होणार आहे.
अभिजित पानसे आणि सचिन मोरे करणार पुष्पवृष्टी
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी पक्षाचे नेते अभिजित पानसे आणि सचिव सचिन मोरे हे करतील अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अमेय खोपकर यांनी दिली आहे या सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त, मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील असा विश्वास अमेय खोपकर यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा-
- Tukaram Beej : तुकाराम बीजोत्सवानिमित्त देहूनगरीत भाविकांची मोठी गर्दी, हरिनामाच्या गरजात वारकरी दंग
- Bhagavad Gita in school : गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही भगवद्गीता, संतसाहित्याचा शालेय शिक्षणात समावेश करावा, भाजपची मागणी
- The Kashmir Files : कश्मीर फाइल्स सिनेमाच्या समर्थनार्थ उल्हासनगरात रॅली, बजरंग दलचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]
Shiv Jayanti : शिवतिर्थावर शिवरायांचा जन्मोत्सव, Raj Thackeray यांच्या उपस्थिती जंगी सोहळा
Raj Thackeray Oath : शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना शपथ Shiv Jayanti 2022
MNS Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीनिमित्त Raj Thackeray यांना कार्यकर्त्यांकडून भगव्या रंगाची शाल
MNS Shiv Jayanti : शिवतिर्थावर मनसेचा शिवजन्मोत्सव, राज ठाकरे सपत्नीक उपस्थित
Shiv Jayanti At Shivaji Park : महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर उपस्थिती, कार्यकर्त्यांना दिली शपथ, उत्साहाचं वातावरण
Shiv Jayanti At Shivaji Park : महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर उपस्थिती, कार्यकर्त्यांना दिली शपथ, उत्साहाचं वातावरण