एक्स्प्लोर

राज्यभरात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, विविध उपक्रमांसह जयंतीचा उत्साह

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. चारशे वर्ष उलटल्यानंतर देखील शिवाजी महाराजांच्या नावाचं गारुड आजही कायम आहे. शिवप्रेमींसाठी आजचा दिवस हा फार मोठा आहे. राज्यभरात आपल्या राजाला वंदन करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.

मुंबई :  जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री 12 वाजताच शिवजयंती साजरी करण्यात आली. रयतेच्या राजाची जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. गावातील गल्लीपासून ते शिवनेरी किल्ला ते अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी लावली. सोबतच राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावागावात शिवजयंती साजरी करण्यात आली. भिवंडीत कुस्ती स्पर्धेचे आयोजन भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे शिवजयंती निमित्ताने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून अनेक कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. जेजुरीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पुणे जिल्ह्यातील जेजुरीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. शिवजयंती निमित्त येथील जिजामाता हायस्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजच्या कलाविभागाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यायलयाच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक, मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते, मावळे अशा वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केली होती. राज्यभरात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, विविध उपक्रमांसह जयंतीचा उत्साह मालोजीराजेंच्या पावनभूमीत शिवनामाचा जयघोष मालोजीराजेंच्या पावनभूमी असलेल्या इंदापूरमध्ये शिवनामाचा जयघोष करण्यात आला. सकल युवा शिवभक्त परिवाराकडून इंदापूरात शिव-जन्मोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनरुढ पुर्णाकृतीची पुतळा तसेच माँ साहेब जिजाऊ, राणी येसुबाई, छत्रपती शिवाजी महाराज,सरसेनापती हंबीरराव मोहीते, मावळे अशा वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांची घोड्यावरुन वाजत गाजत इंदापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सांगलीमध्ये अभूतपूर्व उत्साह शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्साह मध्यरात्री सांगलीमध्ये पाहायला मिळाला. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवासंघ यांच्यासह इतर मान्यवरांनी शिव जन्मकाळ साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या शिवजन्मकाळ सोहळ्यास मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी "शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये शिवजयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. 1987 पासून जेव्हा या स्टेशनचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस होते, तेव्हापासून मोटरमन आणि गार्ड मिळून हा उत्सव साजरा करत आहेत. यात मध्य रेल्वेचे इतर कर्मचारी देखील सहभागी होतात. आज महाराजांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. सीएसएमटीच्या आवारात ही पालखी वाजत गाजत आणली गेली. त्यानंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मग स्टेशनच्या आवारात शिवजयंती साजरी केली गेली. यावेळी शिवरायांची वेशभूषा केलेले प्रति शिवाजी महाराज देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, सोलापूर, मनमाडमध्ये मध्यरात्री शिवजन्मोत्सव साजरा सोलापुरातील शोभायात्रा राज्यभरात शिवजन्मोत्सव साजरा होत असताना इकडे सोलापुरात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक पाहायला मिळालं. मुस्लिम समाजातील बांधवांच्या वतीने देखील शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील शोभायात्रा काढण्यात आली. सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून विजापूर वेस, किडवाई चौक, पेंटर चौक परिसरात ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेश परिधान करण्यात आली होती. तर गेल्या सतरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या शाहीनबाग आंदोलनात देखील मुस्लिम महिलांनी शिवजन्मोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत यावेळेस महिलांनी अभिवादन केलं. शिवजन्मोत्सवच्या पूर्वसंध्येला मुस्लिम बंधू-भगिनींनी रक्तदान शिबीर देखील आयोजित केलं होतं. या वेळी जवळपास 224 लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. समाजात एकता आणि एकात्मता अबाधित आहे हाच संदेश देण्यासाठी शिवजन्मोत्सव साजरा केल्याचे मत यावेळी मुस्लिम बंधू-भगिनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वर्ध्यात मराठा सेवा संघाच्या वतीनं रॅली काढण्यात आली. आर्वी नाका येथून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. रॅलीमध्ये पुरुषांसोबतच महिलादेखील फेटे बांधून सहभागी झाल्या होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर दुमदुमले. पुण्यातही शिवजयंती निमित्त विविध उपक्रम लाल महाल येथे आयोजित केलेला शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मतांच्या तब्बल 85 स्वराज्य रथांचा सहभाग हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरत आहे. यानिमित्ताने महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करुन मिरवणुकीत सहभागी झाले. अनेक चित्त थरारक प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलीय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. मिरवणुकीचे यंदाचे आठवे वर्ष आहे. यामध्ये पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. राज्यभरात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, विविध उपक्रमांसह जयंतीचा उत्साह जयंतीनिमित्त वाशिम शहर झालं भगवं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिम शहर झालं भगवं झालं आहे. वाशिम शहरात सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आले. या रॅल मध्ये शेकडोच्या संख्येने महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. चंद्रभागेच्या पात्रात शिवस्मारकाची प्रतिकृती पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावच्या भुई समाजाने चंद्रभागा पात्रात तरंगते शिवस्मारक केले आहे. शिवजयंती निमित्त चंद्रभागेच्या पात्रात अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा उभारला आहे. पर्यटकांना हे पाहता यावं यासाठी हे समाजबांधव स्वत:च्या होड्यातून घेवून जात आहेत. हा अश्वारूढ पुतळाही स्थानिक कलाकारांनी बनवला असून हे तरंगते स्मारक तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहे. रत्नागिरीत शिवजयंतीचा उत्साह रत्नागिरीत देखील सध्या शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच रत्नागिरीकर शिवजयंतीची मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात तयारी करताना दिसले. कुवारबाव येथे शिवजयंती निमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी पारंपारिक वेशभूषा करत रत्नागिरीकर मिरवणुकीत सहभागी झाले. ढोल-ताशांचा गजर आणि शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार यामुळे आसमंत दुमदुमून निघाला. यावेळी मिरवणुकीदरम्यान ढोल- ताशांच्या तालावर भगवा हातात घेत शिवभक्त मिरवणुकीत मोठ्या जोशाने सहभागी झालेले दिसून आले. देवरूखमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवाजी महाराज की जय असा जयजयकार देखील करण्यात आला. एक हजार पेक्षा जास्त नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. येवल्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून येवल्यातील पाटोळे कुटुंबियांनी सुरु केलेली शिवजयंती मिरवणूक आज ही परंपरेनुसार मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. केवळ येवलाच नाही तर परिसरातील नागरिक या शिवजयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत मुलींचे झांज पथक आणि घोड्यावर स्वार मावळे, जिजाऊ यांच्या वेशभूषा केलेले युवक सहभागी झाले. जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा देत ही मिरवणूक शहरातील अनेक भागातून फिरत शेवटी पुन्हा पाटोळे कुटुंबियांच्या घरी संपली. नवी मुंबईत शिवजयंती उत्साहात नवी मुंबईत ही मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंत साजरी करण्यात आली. नवी मुंबईतल्या वाशीत शिवाजी चौकात आज शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रायगड आणि शिवनेरीवरून पायी शिवज्योत आणून ती प्रथम शिवाजी चौकात आणून छत्रपती शिवाजी स्मारकाला अभिवादन करून आपल्या प्रभागात नेऊन पूजन केले गेले. जयंतीनिमित्त संपूर्ण शहर भागवामय झालं आहे. महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रतापगडावर मोठ्या जल्लोषात जयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज राज्यासह देशात उत्सव सुरु असताना प्रतापगडावरील मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. या उत्सवाला राज्यभरातून शिवभक्तांनी गर्दी केली होती. आज सकाळी गडावरील देवीच्या मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराबाहेर झेंडा फडकवून सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. ही पालखी नंतर वाजत गाजत गडावर नेण्यात आली. यावेळी गडाच्या परिसरातील शाळेतील मुलांनी लेझीम ढोल ताशाचं सादरीकरण केलं. उत्सवात प्रतापगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणात दाखल झाली. अमरावतीत शिवजयंतीनिमित्त रॅली अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथून आज सिपणा कॉलेजच्या तरुण-तरुणींनी शिवजयंतीनिमित्त भव्य मोटर सायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये तरुणींनी पारंपारिक वेशभूषा घालून मोटर सायकल रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ही रॅली संपूर्ण शहरातून काढत पुन्हा सायन स्कोर मैदानावर या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये हजारो तरुण-तरुणींनी हजेरी लावली.

NMC | शिवजयंतीच्या कार्यक्रमात मोबाईल रिंग वाजल्याने तुकाराम मुंढे संतापले | ABP Majha

जयंतीचा परभणीत मोठा उत्साह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीचा मोठा उत्साह परभणीत पाहायला मिळाला. सकाळी सहा वाजेपासूनच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पुष्पहार घेऊन अभिवादनासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली. ज्यात लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. जयंती निमित्त शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे, पताका लावण्यात आल्याने शहर भगवेमय झाले आहे.
बीड शहरामध्ये वर्गणीमुक्त आणि डीजे मुक्त जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बीड शहरामध्ये वेगळे कार्यक्रम होताना पाहायला मिळाले. आज सकाळी आठ वाजता शासकीय शिवपूजन बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पार पडले. यावेळी पोलिसांनी मानवंदना देऊन शासकीय पूजा केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरून अभिवादन झालेला सुरुवात झाली. शहरातील वेगवेगळ्या शाळांचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी वेशभूषा आणि लेझीम ढोल असे खेळ साजरे करत अभिवादन रॅलीमध्ये सहभागी झाले. अभिवादन रॅलीमध्ये मुस्लिम समाजातील शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. शिवजयंती निमित्ताने बीड शहर भगवेमय झाले आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाने यंदा डीजे मुक्त आणि वर्गणीमुक्त शिवजयंती साजरी करण्याचं आयोजन केले आहे. पिंपरी चिंचवडच्या दहा वर्षीये चिमुरडीचा उत्सव गल्ली पासून दिल्लीपर्यंत आज सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जात आहे. यात पिंपरी चिंचवडच्या दहा वर्षीये चिमुरडीने मात्र घरगुती शिवजयंतीचा उत्सव साजरा केला आहे. पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे धडे गिरवलेल्या भूमी चव्हाणने घरीच शिवजन्मस्थळ साकारलं. वडिलांकडे हट्ट धरून स्वखर्चातून महाराजांची सुंदर मूर्ती, साहित्य आणलं आणि स्वतःच शिवनेरी किल्ल्याचे डेकोरेशन ही केलं. हे. औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवजन्माचा देखावा औरंगाबादच्या क्रांती चौकात आज शिवजन्माचा देखावा सादर करण्यात आला. यावेळी शिवनेरी किल्ल्याच्या प्रतिकृती उभारण्यात आली होती. पाळण्यात शिवरायांचा जन्मोत्सव साकारण्यात आला. यावेळी शिवगीते पोवाडे यांच्या गायनाने वातावरण शिवमय करण्यात आलं. शिवजन्माची घोषणा करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रोषणाई करून नागरिकांना शिवजन्माच्या शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. यावेळी पणत्या लावून परिसर उजळवण्यात आला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण
Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी - रोहित पवार
Devendra Fadnavis PC आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, मतमोजणी पुढे ढकलल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Embed widget