एक्स्प्लोर
Advertisement
शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी 23 कोटींचा निधी मंजूर : अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली आहे. या दिशेने सरकारचे काम चालू आहे. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मुंबई : शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी 23 कोटी रुपये मंजूर करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केलं आहे. रयतेचे राज्य आलंय त्यामुळे यावेळी शिवनेरी किल्ल्यावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली आहे. या दिशेने सरकारचे काम चालू आहे. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात आहे. परिसरातील विकास कामांसाठी तातडीने 23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
ShivJayanti 2020 | शिवनेरी गडाच्या विकासासाठी 23 कोटी रुपयांचा निधी देणार : अजित पवार
मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गड दुमदुमुन गेलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शिवनेरीवर दाखल झाले होते. स्वराज्याची राजधानी राहिलेल्या शिवनेरी ग़डावर शिवजयंतीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. राज्यभरातून लाखो शिवभक्त शिवनेरीवर दाखल होत शिवरायांना अभिवादन करतात.
प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गाण्यात आला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.
संबंधित बातम्या :
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, सोलापूर, मनमाडमध्ये मध्यरात्री शिवजन्मोत्सव साजरा
सोलापुरात शिवजन्मोत्सव; वीरमाता, वीरपत्नी, वीरकन्यांच्या हस्ते पाळणा सोहळा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement