एक्स्प्लोर
शिर्डीत साईबाबा मंदिराच्या अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा
मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांनी आपला आणि सोबत असलेल्या सहकाऱ्यांचा हात ओढत असभ्य वर्तन केलं आणि ढकलुन दिलं, असा आरोप महिलेने केला आहे.

शिर्डी : शिर्डीतील साईबाबा मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र जगताप यांनी शिर्डी मंदिरातच गैरवर्तन केल्याचा आरोप एका स्थानिक महिलेने केला आहे. जगताप यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे. साईबाबांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आपण मंदिरात उभे होतो. त्यावेळी मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांनी आपला आणि सोबत असलेल्या सहकाऱ्यांचा हात ओढत असभ्य वर्तन केलं आणि ढकलुन दिलं, असा आरोप महिलेने केला आहे. राजेंद्र जगताप नेहमीच असभ्य वर्तन करत असल्याचा दावाही तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे. राजेंद्र जगताप हे गेल्या 25 वर्षांपासून साईबाबा संस्थानामध्ये कार्यरत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते मंदिर प्रभारी म्हणून काम पाहतात. संस्थानाच्या कामगार सोसायटीचे ते आठ वर्ष चेअरमनही राहिले आहेत. त्यांच्याविरोधात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेच्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलिसांनी कलम 354, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या राजेंद्र जगताप फरार आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
पुणे
क्रिकेट























