एक्स्प्लोर
शिर्डीत साईभक्ताकडून 30 किलो चांदीचं सिंहासन दान

शिर्डी: शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी तब्बल 30 किलो वजनाचं चांदीचं सिंहासन दान करण्यात आलं आहे. दिवाळीनिमित्त बडोद्याच्या जयस्वाल या साईभक्त परिवारानं हे सिंहासन भेट दिलं आहे. 30 किलो वजनाच्या या सिंहासनाची किंमत 18 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. हे सिंहासन शिर्डीतील साईबाबांच्या चावडी मंदिरात ठेवण्यात येणार असून त्यावर साईंची प्रतिमा ठेवणार असल्याची माहिती साई मंदिर संस्थानानं दिली आहे. दिवाळीच्या निमित्तानं देशभरातून लाखो भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली होती. या भाविकांकडून बाबांना वेगवेगळ्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. VIDEO:
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भारत
क्रीडा
महाराष्ट्र























