एक्स्प्लोर

Shimgotsav | कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात; ग्रामस्थांनी पेटवली पहिली होळी

कोकणातील माणूस कामासाठी गावापासून कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांसाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. आज कोकणात पहिल्या होळीला प्रारंभ झाला. ग्रामस्थांनी देवाची पहिली होळी पेटवली. त्यानंतर गावातील वाडीतील होळीला सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी : कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी/त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. या मंदीरात सर्व गावकरी एकत्रित येऊन, पुढील नऊ दिवसांच्या कार्यक्रमाचे नियोजन करतात. त्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदीरातून ढोळांच्या गजरात देवीच्या नावाने बोंबा म्हणजेच फाक मारतात. बाजरपेठेतुन एक फेरी मारुन ग्रामदैवतेच्या सहानेवर सर्व एकत्र येतात. तिथे देवाची पहिली होळी मानकऱ्याच्या हस्ते पेटवली जाते. नंतर गावातील वाडीतील होळ्या पेटवायला सुरुवात होते. असा हा नऊ दिवस कार्यक्रम सुरु राहतो. 

पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरु होतो. त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे. हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे शेवरीचे झाड तोडून (माड) ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत पहाटेचे 4 वाजतात. मग होम केला जातो. ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो, तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात. आणि त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते आणि मग होम पेटवला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात. तो एक महत्त्वाचा विधी असतो.

 Shimgotsav
शिमगोत्सव (रत्नागिरी)

होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी, चाकरमानी घरी जातात. मग थोडेसे झोपून/आंघोळ-देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून गार्‍हाणे नावाचा कार्यक्रम होतो. ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक (गावची सभा) असते. ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते. त्यानंतर तिसर्‍या दिवशी काही ठिकाणी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो. यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो. तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो. 

चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा शिमगोत्सव अनोखा असतो. इथे नवव्या दिवशी ग्रामदैवतेच्या जागेत मैदानावर ग्रामस्थ दोन गटात रात्री विभागून ग्रामस्थ दुतर्फा उभे राहून एकमेकांवर जळती लाकडे ग्रामदैवतेच्या नावाने बोंबा मारून एकमेकांवर फेकतात. हा कार्यक्रम बघण्यासाठी महाराष्ट्रातून अनेकजण येतात. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि भजन, तसेच रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसांत पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव! मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget