एक्स्प्लोर

राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, शरद पवारांच्या सूचना

राज्यभरात होत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा सध्या चिंतेचा विषय आहे. अशात आता राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्या आहेत.

मुंबई : राज्यात कोरोनाचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळं राज्यभरात होत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा सध्या चिंतेचा विषय आहे. याबाबत सरकार सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहेत. अशात आता राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्या आहेत. वसंतदादा शुगर इस्टिट्यूटकडून याबाबत सर्व साखर कारखान्यांना पत्र देण्यात आलं आहे. सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजन उभारणीचे प्रकल्प हातात घ्यावेत. ऑक्सिजन प्रकल्पाला वाफ आणि वीजेची गरज भासते. साखर कारखाने सुरू असताना वाफ आणि वीज उपलब्ध होते. त्यामुळे कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प उभं करायला कमी खर्च लागेल, असं शरद पवार यांनी निर्देशित केलं असल्याचं संचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

सध्याच्या कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळं सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करावे, असं पत्रात म्हटलं आहे. 

Maharashtra Corona Crisis: राज्यात गतीनं ऑक्सिजन आणण्यासाठी आता एअरलिफ्टचा वापर : राजेश टोपे

ज्या साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु आहेत तसेच ज्याेचे सहवीजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत. अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे अशा कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. त्यांच्यासाठी कारखा्यांना सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल असं म्हटलं आहे. यामुळं कारखान्यांना उपलद्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचा वापर केल्याने खर्चसुद्धा कमी येईल.

सध्या कोविडची परिस्थिती भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार ऑक्सिजन उपलद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच मात्र आपल्या सर्व कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असं पत्रात म्हटलं आहे. 

कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करावी. सर्व कारखाने आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करतील याची खात्री आहे, असं पत्रात म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Aditi Tatkare: रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Jayant Patil on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका; म्हणाले, 'लोकशाही मार्गाने...'
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका; म्हणाले, 'लोकशाही मार्गाने...'

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Crime News: सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
Embed widget