एक्स्प्लोर

“लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं” शरद पवारांचा सरकारला टोला

देशात सातत्यान होणारी इंधन दरवाढ मागे घेण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. तसंच बुलेट ट्रेनचा निर्णय दुर्दैवी असल्याचा आरोप केला आहे. कर्जमाफीवर बोलताना “लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं” असं म्हणत जोरदार घणाघात केला आहे.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. “लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं” असं म्हणत कर्जमाफीचाही समाचार पवारांनी घेतला. सातत्याने होणारी इंधन दरवाढ, महागाई, बुलेट ट्रेन आणि कर्जमाफीवर आदी विषयांवर पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अहमदनगरमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर बोलताना पवारांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान देशात सातत्यान होणारी इंधन दरवाढ मागे घेण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. तसंच बुलेट ट्रेनचा निर्णय दुर्दैवी असल्याचा आरोप केला आहे. कर्जमाफीवर बोलताना “लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं” असं म्हणत जोरदार घणाघात केला आहे. महागाई विरोधात शिवसेनेनं सत्तेत राहून नव्हे तर आमच्या सारखं रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचं आवाहन पवारांनी केलं. रामदास आठवलेंना कोणीच गांभिर्यानं घेत नसल्याचं म्हणत त्यांनी आठवलेंची खिल्ली उडवली. इंधन दरवाढीवर नाराजी शरद पवारांनी देशातील इंधन दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत इंधन दरवाढीची गरज नव्हती. देशात सामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळं सामान्य जनतेचा रोषानंतर दरवाढ मागे घेण्याची गरज पवारांनी व्यक्त केली आहे. बुलेट ट्रेनचा निर्णय दुर्दैवी बुलेट ट्रेन हा केंद्राचा आणि राज्याचा दुर्दैवी निर्णय असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. देशातील रेल्वेला आज अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. दर्जा, स्वच्छता, सुरक्षेसह पायाभूत सुविधांचा रेल्वेमध्ये अभाव आहे. मात्र रेल्वेत सुधारणा करण्याऐवजी सरकारनं बुलेट ट्रेनला प्राधान्य दिल्याचा आरोप पवारांनी केला. राज्याला बुलेट ट्रेनची आवश्यकता नसताना विनाकारण त्याचा भार राज्यावर पडल्याचं पवारांनी म्हटलं आहे. बुलेट ट्रेननं राज्यावर अन्याय झाला असून चंद्रपूर, मुंबई आणि पुण्याला जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.  या प्रकल्पात देशाचा विचार करायची गरज होती. मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली मार्गानं बुलेट ट्रेन गेल्यास इतर राज्यांना फायदा झाला असता असंही पवारांनी म्हटलंय. मात्र गुजरात आणि केंद्रानं घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याचा आरोप पवारांनी केला. कर्जमाफीवरुन सरकारवर पवारांचा घणाघात कर्जमाफीवर बोलताना पवारांनी “लबाडा घरचं आवतन जेवल्या शिवाय खरं नसतं” असं म्हटलं आहे. सरकारनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली, आम्ही  सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र त्यातील संपूर्ण शब्द गेला असून आतापर्यंत सहा नवीन जीआर काढल्याचा आरोप पवारांनी केला. सरकारनं कर्जमाफीत तारतम्य ठेवलं नसल्याचा आरोपही पवारांनी केला आहे. शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडून आंदोलन करावं महागाईवर सेनेच्या आंदोलनावर मार्मिक टीका शरद पवारांनी केली. शिवसेनेनं सत्तेत राहून नव्हे तर सत्तेबाहेर पडून आमच्या सारखं रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचं आवाहन पवारांनी केलं. महागाई विरोधात सेना रस्त्यावर उतरल्याचं आम्ही स्वागत करतो. मात्र सरकारमध्ये राहून ही भूमिका बरोबर दिसत नसल्याचं पवारांनी म्हटलं. सरकारमध्ये राहून परिस्थिती सुधारा आणि सुधारत नसेल तर आमच्या सारखं रस्त्यावर येऊन आंदोलन करा असं आवाहन पवारांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget