(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रा. एनडी पाटील यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोक; शरद पवार, नितीन गडकरी म्हणाले...
N. D. Patil Passed Away : एन.डी.पाटील यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रा पाटील यांच्या निधनानंतर शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणेंसह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केलाय.,
N. D. Patil Passed Away : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रा पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले, असं पवारांनी म्हटलं आहे.
डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. pic.twitter.com/HJy9s1TWgT
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 17, 2022
शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. सर्व कुटुंबियांप्रति या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करतो. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव- नितीन गडकरी
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. शेतकरी - कामगार यांचे अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडले व ते सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असं गडकरींनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. शेतकरी - कामगार यांचे अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडले व ते सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 17, 2022
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रा. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान - केंद्रीय मंत्री नारायण राणे