एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब; आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका

Gopichand Padalkar on Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी निशाणा साधत जहरी टीका केली आहे.

Gopichand Padalkar on Sharad Pawar:  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी निशाणा साधत जहरी टीका केली आहे. शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आलीय. त्यामुळे ही घोषणाबाजी करणारे लोकं कोण आहेत? याची चौकशी झाली पाहिजे. सोबतच धनगर समाजाचे वाटोळे हे शरद पवारांनीच केले आहे. असा घाणघातही आमदार गोपीचंद पडळकर  यांनी केला आहे. 

शरद पवारांच्या 50 वर्षाच्या राजकारणात त्यांनी कधी 100 आमदारही निवडून आणले नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरिबांचे कवच कुंडल आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या दुकानाला कुलूप लावले, हे पवारांचे दुखणे आहे. त्यामुळं पवार साहेब  देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत. शरद पवारांच्या 50 वर्षाच्या राजकारणात कधी त्यांनी 100 आमदारही निवडून आणले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण काहीही बदलेले नाही. शरद पवार फुकटची हवा करत आहेत. त्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्तांनी आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हायला हवं, असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केलं आहे.

गोपीचंद पडळकरांविरोधात आदिवासी संघटना आक्रमक

आदिवासी जाती जमातीमध्ये बोगस आदिवासींची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.  यामध्ये धनगर समाजाला देखील आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही प्रशासकिय अधिकारी प्रयत्न करीत आहे. तसेच आदिवासी विरोधात वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध म्हणून आज धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको करत आंदोलन केले.

प्रशासकीय आदिवासी विभागाच्या महत्वाच्या पदावर जे अधिकारी आपली मनमानी कारभार चालवत आहे, अश्या अधिकाऱ्यांना हटविण्यात यावे. तसेच मुळ अधिवासी समाजात बोगस अधिवासींचा समावेश झाला आहे, त्यांना आदिवासी बांधवाना मिळणाऱ्या शासकिय लाभ मिळू नये. तसेच धनगर जातीला आदिवासींचे आरक्षण दिले जाऊ नये. तसेच आदिवासींचा अपमान करणारे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले, यावरू आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या  आपल्या शब्दात चांगलाच खरपूस समाचार यावेळी घेतला आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या घेऊन हा रास्ता रोको करत तीव्र आंदोलन यावेळी करण्यात आले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतातMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget