एक्स्प्लोर

शरद पवारांनी चालवला सुसाट टेम्पो! मी म्हणालो, 'पवारसाहेब टेम्पो चालवताय की विमान?' तर म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. आता एक नवीन भन्नाट किस्सा समोर आला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. आता एक नवीन भन्नाट किस्सा समोर आला आहे. हा किस्सा सांगितलाय पत्रकार सुधीर भोंगळे यांनी. प्रसंग होता शरद पवारांवर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहाचा. अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं 'नेमकचि बोलणें' या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना भोंगळे यांनी पवारांच्या 'ड्रायव्हिंग स्किल'चा एक किस्सा सांगितला. 

भोंगळेंनी सांगितलं की, एक दिवस पेरणे वाल्हे गोलाई परिसरात गारपीट झाली. तिथं मोठं नुकसान झालं होतं. शरद पवार त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्यांनी मला सकाळी सहा वाजता सर्किट हाऊसला बोलावलं. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हे अर्थमंत्री होते. नुकसानबाधितांना कमी मदत मिळाल्यामुळं त्यांना पवारांनी फोन लावला आणि म्हटलं गरीबांची चेष्टा काय करताय, शेळी मेली तर 100 रुपए नुकसान भरपाई देताय. किमान हजार, दोन हजार तरी मदत करायची ना, असं पवारांनी शिंदे यांना सांगितलं असल्याचं भोंगळेंनी सांगितलं.

भोंगळे पुढे म्हणाले की, मग आम्ही घटना घडलेल्या ठिकाणी निघालो. तिथं काही कारणानं पवारांची गाडी जात नव्हती. मग एक 16 सीटरचा टेम्पो होता. तो जात होता. मग आम्ही त्या टेम्पोनं जायचं ठरवलं. स्वत: शरद पवारांनी टेम्पो चालवायला घेतला. मला म्हणाले पुढं बस माझ्यासोबत. इतक्या जोरात पवार साहेब टेम्पो चालवत होते की धडाधड टेम्पो उडत होता. आणि आमचं डोकं टपाला आदळत होतं. मी पवार साहेबांना म्हटलं की, अहो गाडी चालवताय का विमान चालवताय. तर ते म्हणाले की, पवारांना असल्या गाड्या हळू हळू चालवायला जमतच नाही. ते राज्य देखील असंच धडाक्यानं चालवत आले आहेत. महाविकास आघाडीची गाडी देखील ते अशीच चालवत आहेत आणि भविष्यातही चालवत राहतील, असं भोंगळे म्हणाले. हा किस्सा ऐकत असताना शरद पवार यांनी देखील हसून दाद दिली. 

यावेळी भोंगळे म्हणाले की, हे पुस्तक शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह आहे. हे पुस्तक म्हणजे भविष्यासाठी एक ठेवा आहे. काही दिवसांपूर्वी आप्पासाहेब पवारांवरील काही लिहिलं होतं. यातील काही चॅप्टर मी राजेंद्र पवारांना वाचून दाखवले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी म्हटलं की, आमचे वडील आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला कळलेत, असंही सुधीर भोंगळे यांनी सांगितलं.
 
पुस्तकाचं प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेना खासदार संजय राऊत, रंगनाथ पठारे, कवी किशोर कदम, सुधीर भोंगळे यांची उपस्थित होते. तर डॉ. विजय केळकर ऑनलाईन उपस्थित होते. तर शरद पवार, दिलीप वळसे, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे देखील हॉलमध्ये उपस्थित होते.

एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jain White Line Controversy: गिरगावात जैनांच्या पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या मनसैनिकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, सरकारी आदेशाच्या उल्लंघनाचा ठपका
गिरगावात जैनांच्या पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या मनसैनिकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, सरकारी आदेशाच्या उल्लंघनाचा ठपका
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Mumbai Crime: मुंबईत बड्या राजकीय नेत्याचं बारमधील मुलीशी नको ते कृत्य, रिव्हॉल्व्हर दाखवून शरीराचे लचके तोडले, पोलीस आयुक्तांकडून कारवाईसाठी महत्त्वाचा आदेश
मुंबईत बड्या राजकीय नेत्याचं बारमधील मुलीशी नको ते कृत्य, रिव्हॉल्व्हर दाखवून शरीराचे लचके तोडले, पोलीस आयुक्तांकडून कारवाईसाठी महत्त्वाचा आदेश

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; शिंदे गटाला मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; शिंदे गटाला मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Operation Tiger Shivsena: ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
Embed widget