Sharad Pawar Book: शरद पवारांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगातीच्या सुधारित' आवृत्तीचे प्रकाशन
Sharad Pawar Book: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.
Sharad Pawar Book: शरद पवारांचं (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, एबीपी माझाआणि एबीपी न्युजचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा सोहळा पार पडला. लोक माझे सांगाती पुस्तकातील नव्या आवृत्तीत 75 पानं वाढवण्यात आली आहेत. शरद पवारांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे.
सर्व घटना तटस्थपणे मांडल्या आहेत: राजीव खांडेकर
राजीव खांडेकर म्हणाले, ज्या व्यक्तीचं गूढ संपूर्ण देशाला पडलेलं आहे. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. या निमित्ताने त्यांना आणखी समजून घेता आलं. राज्याचा सगळ्यात मोठा संघर्षाचा महत्वाचा कालावधी घडत असताना तो काळ त्यांच्याकडून समजून घेणं हा कालावधी माझ्यासाठी महत्वाचा होता. पावसातील सभा, महाविकास आघाडीची स्थापन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शपथविधी या सर्व घटनांबद्दल शरद पवारांचे विश्लेषण, निरीक्षण अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्याचं राजकरण शरद पवारांच्या भोवती फिरत असताना देखील त्यांनी भूमिका तटस्थपने त्यांनी मांडल्या आहेत. महाविकास आघडीचे सरकार असताना रिमोट कंट्रोल म्हटले जात होतं. आज देखील अनेक मंत्री आंदोलक शरद पवार यांचीच भेट घेत आहेत.