(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahajibapu Patil : ठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते, कोणी पोराने ती वापरू नये, शहाजीबापू पाटील यांचा आदित्य ठाकरेंना टोला
Shahajibapu Patil : आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्याचे नातू म्हणून महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यांच्या नावामागचे ठाकरे नाव काढले तर 50 माणसांची सभा देखील ते घेऊ शकणार नाहीत असा टोला शहाजीबापू यांनी लगावला.
पंढरपूर : कॉपी करून आलेले डुप्लिकेट नेतृत्व कधीही टिकत नसते. ठाकरी भाषा फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमुख यांनाच शोभत होती. कोणी पोराने ती वापरू नये, असे म्हणत आमदार शहाजीबापू पाटील यांनी (Shahajibapu Patil) थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वावर प्रश्न उभा केला आहे.
सध्या आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असताना त्यांच्या भाषेबाबत देखील उलटसुलट चर्चा सुरु झालेली दिसत आहे. ठाकरी भाषा ही फक्त शिवसेनाप्रमुख यांनाच शोभत होती, कोणाही पोराने ती वापर नये असा सणसणीत टोला शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. वारंवार आदित्य ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांना गद्दार संबोधत असल्याने संतापलेल्या शहाजीबापू पाटील यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केला.
वेडेवाकडे बोलणे बंद नाही झाले तर आम्हालाही उलट्या बाजूने उत्तर द्यावे लागेल
आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्याचे नातू म्हणून महाराष्ट्रभर फिरत आहेत. ते लोकमतातले नेतृत्व म्हणून फिरत नाहीत . त्यांच्या नावामागचे ठाकरे नाव काढले तर 50 माणसांची सभा देखील ते घेऊ शकणार नाहीत असा टोला शहाजीबापू यांनी लगावला. एका बाजूला गद्दार म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला या या कशाला म्हणायचे असा सवाल करत आता आमच्याकडे तुमचे काय काम, कोणीही येणार नाही असे सुनावले. आम्ही ठाकरे कुटुंबाचा आदर करतो, मातोश्रीबाबत आम्हाला प्रेम आहे म्हणून आम्ही ऐकून घेत आहोत पण आता वेडेवाकडे बोलणे बंद नाही झाले तर आम्हालाही उलट्या बाजूने उत्तर द्यावे लागेल असा इशारा दिला.
आदित्यसारख्या लहान पोराने ठाकरी भाषा वापराने योग्य नाही
ठाकरी भाषा फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभते , जे साहेबांच्या क्लिप काढून त्यांच्या सारखी भाषा वापरायची त्यांच्यासारख्या अॅक्शन करायच्या हे शोभून दिसत नाही असे सांगत कोणतेही नेतृत्व त्याच्या नैसर्गिक गुणांनी घडते असे सांगितले. जगात कोणतेही डुप्लिकेट नेतृत्व टिकले नाही असे सांगताना तुम्हाला वारसा म्हणून आलेले नेतृत्व शिवसैनिकांनी स्वीकारले. तुम्ही एखादा ठाकरी शब्द वापरला तर तो जिव्हारी लागणार नाही मात्र आदित्यसारख्या लहान पोराने ही भाषा वापराने योग्य नाही. सर्व आमदारांची वये मोठी आहेत. मोठ्या माणसांना कसे बोलावे याचे संस्कार घरातून मिळाले नाहीत का? असा सवाल देखील शहाजीबापू पाटील यांनी विचारला.
आम्ही धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणार त्यांनी हवे तर ढाल तलवार चिन्ह घेऊन लढावे
सर्व निवडणुका शिवसेना भाजप एकत्रित लढणार असून यावेळी उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असेल असा खुलासाही शहाजीबापू यांनी केला आम्ही धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणार असून त्यांनी हवे तर ढाल तलवार चिन्ह घेऊन लढावे आपल्याकडे शस्त्रांचा काय तोटा आहे का असा टोलाही लगावला. घ्या चिन्ह आणि या मैदानात असे आव्हान दिले .
महाराष्ट्र एका किरकिऱ्या कार्ट्याकडून शांत झाला
संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक योग्य असून आज मात्र महाराष्ट्र एका किरकिऱ्या कार्ट्याकडून रिकामा आणि शांत झाला असा टोला लगावला . आता तो काय सात - आठ वर्षे बाहेर येत नाही असा टोलाही शहाजीबापू यांनी संजय राऊत याना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या
Shahaji Patil : काय ती झाडी, काय तो व्हायरल कॉल; शहाजीबापूंना कॉल करणारे रफिक भाई म्हणाले...
Shahaji Patil : सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे 'शहाजीबापू' कोण? पाहा त्यांची राजकीय कारकीर्द