एक्स्प्लोर
'ठाकरे' चित्रपटाचा सिक्वेल येणार : संजय राऊत
नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आज त्यांनी एबीपी माझाच्या 'ब्रेकफास्ट न्यूज'मध्ये अनेक आठवणींना उजाळा दिला. नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे.
बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्व पुढच्या पीढीसाठी मोठ्या पडद्यावर यावं असं मला वाटलं. आधी 'बाळकडू' नावाचा सिनेमा आम्ही आणला होता. आता 'ठाकरे' या चित्रपटाची निर्मिती करतोय, जो मराठी आणि हिंदी भाषेत आहे. दोन तास 10 मिनिटांचा हा पहिला भाग आहे. त्याचा सिक्वेल सुद्धा येणार आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात 1995 पर्यंतचा बाळासाहेबांचा जीवनपट दाखवणार आहे. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी करतोय. त्यानेही या सिनेमासाठी अभ्यास केला. 23 जानेवारी 2019 रोजी 3000 स्क्रीनवर या सिनेमाचा वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर आहे, असं संजय राऊत म्हणाले.
"मी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ बाळासाहेबांच्या संपर्कात होतो. 'सामना'चा संपादक म्हणून त्यांचा जवळून सहवास लाभला. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्व लार्जर दॅन लाईफ आहे. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व शतकातून एकदाच होतं. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भारतात किंवा महाराष्ट्रात जर मोठं व्यक्तिमत्त्व निर्माण झालं असेल ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आज मराठी माणूस मुंबईपासून दिल्लीपर्यंत ज्या ताठ मानेने चालतोय आणि अभिमानाने सांगतोय ते बाळासाहेबांमुळे. बाळासाहेबांनी सामान्य माणसातील सामान्यपण असामान्य करण्याचा प्रयत्न केला. माझासारखे असंख्य त्यांचे ऋणी आहेत," अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement