एक्स्प्लोर
पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजय पवार हे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी बनले होते. नुकतीच त्यांची पोस्टींग मंत्रालयात कौशल्य विकास विभागात झाली होती.
पंढरपूर : घरगुती वादातून एका जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे घडली. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून काल रात्री आपल्या पत्नीवर 2 गोळ्या झाडल्या.
VIDEO | मंत्रालयातील सचिव विजयकुमार भागवत पवारांची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी पत्नीवर गोळीबार | पंढरपूर | एबीपी माझा
यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पवार यांच्या पत्नीला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून सध्या ते मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत होते. घरगुती वादातून त्यांनी मध्यरात्री एक वाजता राहत्या घरी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी पत्नीवर गोळीबार केला. त्यांच्या पत्नी सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजय पवार हे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी बनले होते. नुकतीच त्यांची पोस्टींग मंत्रालयात कौशल्य विकास विभागात झाली होती.
मंत्रालयात नुकतीच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे सहसचिव म्हणून रुजू झालेले विजय पवार हे बदलीनंतर गावाकडे आले होते . सुरुवातीपासूनच त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद होते. पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला आणि दुसऱ्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर काही वर्षांपूर्वी पवार यांनी हे तिसरे लग्न केले होते. या पत्नीसोबतही त्यांचे नेहमीच कलह होत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री साडेबारा वाजता त्यांनी आपल्या झोपलेल्या पत्नीला गोळी मारली .मात्र ही गोळी डोक्याऐवजी नाकाजवळून आरपार गेल्याने पत्नी जागी झाली. तिने दिवा लावताच पवार हे पिस्टल घेऊन तिच्या मागे लागले. तिने आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक धावून आले. मात्र पवार यांनी घराबाहेर येत पिस्टल घेऊन लोकांना धमकावत आपल्या पत्नीवर दुसरी गोळी झाडली जी तिला काखेत लागली.
यानंतर त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले, लोकांनी दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवला मात्र पवार यांनी दरवाजा उघडला नाही. काही वेळात पोलिसही घटनास्थळी पोचले आणि त्यांनी पत्नी सोनाली हिला ऍम्ब्युलन्समधून सोलापूरला हलविले. पोलिसांनी पवार यांना बाहेर काढण्यासाठी खिडकीतून पहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर दरवाजा तोडून पवार यांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार विजय पवार यांना दारूचे व्यसन होते. घरातील कौटुंबिक कलहाने त्यांची मानसिकता ठीक नव्हती. या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement