एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Tiware Dam Burst | तिवरे धरण फुटीबाबत दुसरा अहवाल राज्य शासनाकडे सादर

कोकण विभागातील जलसंपदा पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी दौर्‍यात सहभागी झाले होते. नवीन चौकशी समितीने आपला अहवाल शासनाकडे दिला आहे.

रत्नागिरी : तिवरे धरण फुटीबाबतच्या प्रमुख कारणांचा सविस्तर तपशील असलेला दुसरा अहवाल नव्याने नियुक्त केलेल्या समितीमार्फत राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे. तिवरे धरण फुटल्याने त्यात 23 ग्रामस्थांचा बळी गेला होता. पाण्याचा लोंढा अचानकपणे वाढल्याने धरण फुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. काही अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी बांधकामातील तांत्रिक चुकांमुळे धरण फुटल्याचा आरोप केला होता. धरण फुटण्यामागील मुख्य कारणांची शहानिशा करण्यासाठी पाटबंधारे विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन राज्य शासनाने एक समिती स्थापन केली होती. विधानसभा निवडणुकीच्या निवडणुका होण्यापूर्वी या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर पहिल्या समितीच्या अहवालात धरणफुटी बाबतची वस्तूस्थिती स्पष्टपणे नमूद केलेली नसल्याचे नवीन शासनाच्या निदर्शनास आले.

तिवरे धरणफुटी याबाबतची वस्तुस्थिती सर्वांना समजावी यासाठी नवीन शासनाने दुसरी चौकशी समिती नेमली आहे. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पुणे जलसंपदा विभागाचे अप्पर आयुक्त सुनील कुशीरे, याच विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणेले हे समितीतील सदस्य म्हणून कार्यरत आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष, सदस्य यांनी तीवरे धरणावर जाऊन शासनाला अपेक्षित असलेली माहिती संकलित केली होती. कोकण विभागातील जलसंपदा पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी दौर्‍यात सहभागी झाले होते. नवीन चौकशी समितीने आपला अहवाल शासनाकडे दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होताच या अहवालाची तपासणी शासनामार्फत करण्यात येईल. त्यानंतरच तिवरे धरण नेमके कोणत्या कारणामुळे फुटले याबाबतची वस्तुस्थिती शासनामार्फतच अधिकृतरित्या जाहीर केली जाणार आहे.

तिवरे धरणफुटीमागचा 'खेकडा' कोण? 

2 जुलै 2019 रोजी रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी धरण फुटलं आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. धरण फुटलं आणि पाण्याच्या प्रवाहाच्या बाजुला असलेली ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसलं आणि तिथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या पाण्यात शेती वाहून गेली. तिवरे धरण 2000 या साली मातीचा वापर करुन बांधण्यात आलं होतं. तेव्हापासून या धरणात पाणी साठत होतं. जेव्हा धरण गळू लागलं, तेव्हा याच्या तक्रार ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

'त्या' पत्राची दखल घेतली असती, तर तिवरे धरणफुटी घडली नसती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP MajhaZero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget