एक्स्प्लोर

Satej Patil : नेव्हीला बदनाम करू नका, चूक झाली असेल तर माफी मागा; शिवरायांच्या पुतळ्यावरुन सतेज पाटील संतापले

Satej Patil : देशात नेव्हीचा वेगळा इतिहास आहे. नेव्ही वर ढकलन म्हणजे नेव्हीचां अपमान करण्यासारखा आहे. त्यामुळे नेव्हीला बदनाम करू नका, असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते (Narendra Modi) आठ महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेला सिंधुदुर्ग (Sindhudurg) किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) कोसळने ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने  अतिशय दुर्दैवी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर आज वेदना होत आहेत, संताप होतोय. पुतळा तयार करताना योग्य खबरदारी घेतली नाही हे यावरून दिसतंय. उद्धघटन घाईसाठी अनुभव नसणाऱ्या लोकांना हे काम दिलं गेलं होतं. इव्हेंट करण्यासाठी इतकी गडबड केली गेली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असं करतंय हे खरचं दुर्दैवी आहे.

देशात नेव्हीचा (Indian Navy) वेगळा इतिहास आहे. नेव्ही वर ढकलन म्हणजे नेव्हीचां अपमान करण्यासारखा आहे. त्यामुळे नेव्हीला बदनाम करू नका, चूक झाली असेल तर शासनाने माफी मागितली पाहिजे. सोबतच या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे.

चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी- सतेज पाटील

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण तात्काळ घटनास्थळाकडे गेले आहेत. मात्र, आता या पुतळ्याच्या उभारणीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन या पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे होते, अशी माहिती दिली. तर, झालेली घटना दुर्दैवी असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

अशातच आता शिवरायांच्या पुतळ्यावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील हे सारकारवर चांगलेच संतापले आहेत. आपटे नावाच्या व्यक्तीला हे काम देण्यासंदर्भात नेव्हीला कोणी सांगितलं, कोणत्याही शास्त्रात न बसणार नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं गेलं. चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी मात्र हे नेव्हीवर ढकलू नये. नेव्ही ला बदनाम करू नका. स्वतः च पाप दुसऱ्यावर ढकलण्याचं काम हे सरकार करतंय. असा घणाघात आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे.

हे महायुती नाहीतर महागळती सरकार-  सतेज पाटील 

पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले की, कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की पुन्हा उभारला जाणारा पुतळा हा महाविकास आघाडी कडूनच उभारला जावा. तर ती जबाबदारी आता आमचीच असेल. पुतळा उभा करताना एक नियमावली आहे. कला संचानलय या पुतळ्याची पाहणी आणि कामकाज पाहतं. परवानग्या देताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. हे महायुती नाहीतर महागळती सरकार आहे. संसद, राम मंदिर, विमानतळ या ठिकाणी गळतीच्या घटना घडल्या. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही पडला.  ही तर संतापजनक आणि महाराष्ट्राला मागे नेणारी घटना आहे. असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024: ABP MajhaDevendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाहीABP Majha Headlines : 08 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
Embed widget