'तुम्ही 'शिक्षक'चा उमेदवार द्या, निवडून आणायची जबाबदारी माझी' सतेज पाटलांनी करून दाखवलं
पुणे शिक्षक मतदार संघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून पहिल्यापासून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आग्रही होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्याकडे एका भर सभेत सतेज पाटील यांनी कोल्हापूरला उमेदवारी देण्याची मागणी केली होती.
कोल्हापूर: पुणे शिक्षक मतदार संघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून पहिल्यापासून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आग्रही होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्याकडे एका भर सभेत सतेज पाटील यांनी कोल्हापूरला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की तुम्ही फक्त उमेदवार द्या निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील. काल निकालानंतर सतेज पाटील यांनी आपले शब्द खरे करून दाखवले. शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर निवडून आले आहेत.
आसगावकर हे मूळचे कोल्हापूरचे असून पहिल्यापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. वेगवेगळ्या व्यासपीठांवर शिक्षकांची कामं ते करत असतात. पाच जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीत जिद्दीनं बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विश्वजित कदम आदी नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. महाविकास आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई झाली.
चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत असतील 'काश आज ईव्हीएम होता' : हसन मुश्रीफ
चंद्रकांत पाटील यांचा त्रिफळा उडवला
मतदानादिवशी आम्ही पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात हॅट्रिक करणार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. मात्र त्याच दिवशी सतेज पाटील म्हणाले होते. निकालाचा दिवस येऊ दे दादांचा त्रिफळा उडालेला दिसेल. त्याच पद्धतीने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात भाजपची मोठी पीछेहाट झाली.
आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजय मिळवला. शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला 25 हजार 114 हा अकडा पार करणे आवश्यक होते. परंतु पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुरूवातीपासूनच आघाडीवर आसलेले आसगावकर यांना पहिल्या पसंतीत केवळ 16 हजार 874 मते मिळाली. यामुळे नियमानुसार निवडणूक यंत्रणेला दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली. यामध्ये देखील 33 व्या फेरीपर्यंत आसगावकर यांना 25 हजारांचा कोटा पूर्ण करता आला नाही. 33 व्या फेरीत आसगावकर यांना 22 हजार 345, सावंत यांना 15 हजार 357 तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना 7 हजार 294 मते मिळाली. यामुळेच आसगावकर यांच्या विजयासाठी शेवटची 34 फेरीची म्हणजे सावंत यांच्या दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली. यात आसगावकर यांनी मतांचा निश्चित केलेला कोटा पूर्ण करत 25 हजार 985 मते घेतली. तर सावंत यांना 15 हजार 357 मते मिळाली. यामुळे आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय झाला.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विजयी उमेदवार औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड पुणे शिक्षक मतदारसंघ - जयंत आसगांवकर नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजीत वंजारी अमरावती शिक्षक मतदारसंघ - किरण सरनाईक
संबंधित बातम्या Maharashtra MLC Election Results 2020: निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा झाला, शिवसेनेला भोपळा मिळाला : चंद्रकांत पाटील Maharashtra MLC Election Results 2020: भाजपच्या गडांना हादरा, काँग्रेसला नवसंजीवनी, एकीच्या बळाचा महाविकास आघाडीला फायदा 'महाराष्ट्रातील चित्र बदलतेय, हा एकजुटीचा विजय', शरद पवारांची प्रतिक्रिया