Satej Patil on Cognress : ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार
विश्वजीत कदम यांना राज्याचा नकाशावर आणायचे असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर 100 टक्के सत्ता आणा. आतापासून कामाला लागा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

Satej Patil on Cognress: ज्यांना जायचं होते ते सगळे आता गेले आहेत. आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील, असा निर्धार काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त 'लोकतीर्थ' या वर्षपूर्ती समारंभात सतेज पाटील यांनी बोलताना सांगलीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 100 टक्के सत्ता आणण्याचे आवाहन केले.
विश्वजीत कदमांना राज्याचा नकाशावर आणायचे असेल तर..
सतेज पाटील म्हणाले की, विश्वजीत कदम यांना राज्याचा नकाशावर आणायचे असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर 100 टक्के सत्ता आणा. आतापासून कामाला लागा. सत्ता असो की नसो पलूस कडेगावमध्ये कदम ब्रँड लोकांच्या उपयोगी पडत आहे. सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेची सत्ता आली पाहिजे. सांगली जिल्हा परिषदवर काँग्रेसची सत्ता आहे असे ते ताठ मानाने सांगितले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
विशाल पाटील देखील दिल्लीत गेले
पाटील यांनी सांगितले की, दुष्काळी दौऱ्यात असताना जयकुमार गोरे यांनी पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांच्याकडे चारा छावणीची मागणी केली. चार तासात पतंगराव कदम यांनी चारा छावणीचा जीआर काढण्यासाठी सांगितले होते. आजचा नेता दुपारी कुठे आणि आणि संध्याकाळी कुठे आहे हे माहित नाही ही आजची राजकीय परिस्थिती आहे. पतंगराव कदम यांच्यानंतर पलूस कडेगावमध्ये काय? असा प्रश्न होता. आता विश्वजीत कदम तुमच्या सोबत आहेत. दोनवेळा निवडून दिलेच आहेच, त्यांच्या भूमिकेमुळे विशाल पाटील देखील दिल्लीत गेले. जागावाटपावरून आमची चर्चा सुरु होती. महाविकास आघाडी होती, पण विश्वजीत कदम यांना म्हणालो तुम्ही व्हा पुढे आम्ही आहोत सोबत. निवडून आल्यावर सगळे विसरतात, असेही सांगली लोकसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीवर ,सतेज पाटील यांनी भाष्य केलं.
जयश्री पाटील यांच्यावर नाव न घेता टीका
दरम्यान, खासदार विशाल पाटील म्हणाले की, पतंगराव कदम हे आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. आमच्या भावकीला लोकतीर्थवर आणून बसवले असते तर ते पक्ष सोडून गेले नसते, असे सांगत विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी व्होट चोरीचा मुद्दा काढला ते लोकांना पटले. राहुल गांधी यांनी या पूर्वीच जीएसटी दोनच स्लॅब असावेत असे सांगितले होते. आता भाजप सरकारने जीएसटीचे दोन स्लॅब केले. देशाला काँग्रेसच्या विचारानेच चालावे लागेल, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























