एक्स्प्लोर

Kolhapur Election 2022 : भाजपच्या विखारी प्रचाराला कोल्हापूरनं विचारी उत्तर दिलं, आता कोल्हापूर पॅटर्न देशाभरात राबवू : सतेज पाटील

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. ज्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Satej Patil : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआने विजय मिळवला असून काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा जवळपास 18 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. दरम्यान कोल्हापूरात मविआ सरकार झाल्यापासून तसंच त्याआधीपासून काँग्रेस पक्षाचा मोठा चेहरा म्हणून प्रसिद्ध पालकमंत्री सतेज पाटील यांनी विजयानंतर आनंद साजरा करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरने पुन्हा एकदा भाजपाला मात दिली असून हाच कोल्हापूर पॅटर्न देशभरात राबवू असं सतेज यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या विखारी प्रचाराला कोल्हापूरनं विचारी उत्तर दिलं असं म्हणत सतेज यांनी भाजपने अत्यंत चूकीच्या प्रकारे प्रचार केला पण तरीही अखेर विजय महाविकास आघाडीचाच झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी असल्याने इथे समतेचा संदेश दिला जातो. तसंच योग्य नियोजन केल्यास भाजपला पराभूत केले जाऊ शकते असं ते म्हणाले. 2019 मध्ये देखील कोल्हापूरने भाजपला पराभूत केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मविआने हीच कामगिरी केली असल्याने कोल्हापूर पॅटर्न देशाभरात राबवून भाजपला पराभूत केले जाऊ शकते, असं सतेज यांनी म्हटलं आहे.  तसंच हा विजय मविआतील सर्व पक्षांचा मिळून असल्याचंही सतेज यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा

- 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले 

- राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला

- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले

- त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते

- तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते

संबंधित बातम्या

Satej Patil : सतेज पाटलांचा झंझावात, कोल्हापूर भाजपमुक्त! 2015 पासून एकही पराभव नाही

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

Kolhapur North By Election Results 2022 : जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Nagpur News : बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!
Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!
Sunita Williams : डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
Embed widget