शहरांमधील सातबारा बंद करणार, शेतजमीन शिल्लक न राहिल्यानं सरकारचा निर्णय
साताबाराऐवजी आता शहरात प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
![शहरांमधील सातबारा बंद करणार, शेतजमीन शिल्लक न राहिल्यानं सरकारचा निर्णय Satbara will be closed in all cities the decision of the government as there is no agricultural land left in many cities शहरांमधील सातबारा बंद करणार, शेतजमीन शिल्लक न राहिल्यानं सरकारचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/07/60407d3e2f4c215cc41ed62cf0efb271_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे आता शेजमिनी शिल्लक राहिलेल्या नाही त्यामुळे आता सर्व शहरांमधील सातबारा बंद करण्यात येणार आहे. याची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर हवेली, सांगली, मिरज आणि नाशिक शहरांपासून करण्यात येईल. ज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये शहरीकरण आणि बिनशेतीकरणामुळे शेतजमीनच शिल्लक राहिलेली नाही. या ठिकाणी संबंधित सातबाऱ्यांचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर झाले असताना अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक टॅक्स व अन्य गोष्टींचा लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो.
वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमीन उरलेली नाही. त्यामुळे सातबारा बंद करण्याचा भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेण्यात आला आहे. करचुकवेगिरी आणि तसेच फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिटी सर्व्हे झाला परंतु सातबारा उतारा नाही, अशा काही जमीनी आहेत. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन न्यायलयीन खटल्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे साताबारा ऐवजी प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातबारावर कोणकोणता तपशील असतो?
- सातबारा उताऱ्यावर महसूल खात्याच्या जमीन नोंदवहीतील तपशील असतो
- जमिनीचा गट नंबर किंवा सर्व्हे नंबर, त्यामध्ये जमिनीच्या मालकाचं किंवा ती जमीन कसणाऱ्याचं नाव
- जमिनीचं क्षेत्र - पोटखराब क्षेत्र म्हणजेच लागवडीयोग्य नसलेलं क्षेत्र
- जिरायत अथवा बागायत याचा तपशील
- मागील हंगामात घेतलेल्या पिकांचा तपशील
- शेतकऱ्याने त्या जमिनीवर घेतलेल्या कर्जाचा तपशील
- कोणत्या बँकेचं किती कर्ज, गहाणखत कोणाच्या नावावर याचा तपशील
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Ahmednagar : भाज्यांचे दर कडाडले; बदलत्या हवामानामुळे आवक घटल्याने दरांमध्ये वाढ
- डाळिंब बागा वाचविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट
- Hingoli News : पपई पिक संकटात, रोगांचा प्रादुर्भाव; औषधांचाही उपयोग होईना, बळीराजा चिंतेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)