एक्स्प्लोर
आई-पत्नीवर हल्ला करुन तरुणाचे स्वतःवर वार, पत्नीचा मृत्यू
साताऱ्यात तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे.
सातारा : साताऱ्यात एका तरुणाने आपल्याच कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करुन स्वतःवरही वार केले. तरुणाच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे.
साताऱ्यातल्या वराडे गावात काल रात्री ही घटना घडली. आरोपी सागर घोरपडे याने आई कल्पना आणि पत्नी मोहिनी यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वत:वरही त्याने वार करुन घेतले.
हल्ल्यात पत्नी मोहिनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर आई कल्पना गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपी सागर आणि आई कल्पना यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोलापुरात कालच एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाच्या कुटुंबासह जन्मदात्या आईला पेटवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर साताऱ्यातील या घटनेने थरकाप उडवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement