एक्स्प्लोर
खा. उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्त उदयनराजेंनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे.
सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्त उदयनराजेंनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमामुळे उदयनराजे आणि अजित पवार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु होण्याचे चित्र आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात दरी वाढली होती. पण या कार्यक्रमाचे निमंत्रण उदयनराजेंनी स्वत: अजित पवारांना दिले. त्यामुळे अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आज उदयनराजेंच्या मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. त्यात साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविणे, भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन, पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर उभारणी प्रारंभ आणि पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांबरोबरच एका मेळाव्याचे आयोजन केले आहे.
उदयनराजेंचा अल्पपरिचय
उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. यापूर्वी 2009 ची लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती.
तरुणांमध्ये ते सर्वाधिक लोकप्रिय आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही, उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्या ताफ्यात दहा आलिशान गाड्या आहेत. पण तरीही आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ते कधी स्कूटर किंवा बाईकचा वापर करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement