एक्स्प्लोर
Advertisement
चांगला भाव दिला तर ऊस, अन्यथा बांबू: अजित पवार
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या खास शैलीतील भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी काल साताऱ्यातही त्यांच्याच शैलीत सरकारसह आपल्याही नेत्यांवर टीका केली.
ऊसाला चांगला भाव देतील त्यांना ऊस मिळेल आणि जे चांगला भाव देणार नाहीत, त्यांना बांबू मिळेल अशा शब्दात अजित पवारांनी आपल्याच नेत्यांवर टीका केली.
सातारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
जे कारखाने जास्त ऊसाचं गाळप करतील, चांगला भाव देतील, त्यांची प्रगती होईल. त्यांना ऊस मिळेल, जे भाव देणार नाहीत, ऊस गाळप करणार नाहीत त्यांना 'बांबू' मिळतील असं अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी 'अच्छे दिन'वरुनही टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर जाहिरात करताना 2 कोटी महिलांना सम्मान दिल्याचे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत. मात्र कशाचा सन्मान, बोडक्याचा सन्मान, असं अजित पवार म्हणताच एकच हशा पिकला.
जे कारखाने ऊसाला चांगला दर देतील, त्यांना ऊस मिळेल आणि जे दर कमी देतील त्यांना बांबू मिळतील, असंही अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी सरपंच जनतेतून निवडला जाणार असेल तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानसुद्धा जनतेतून का निवडले जाऊ नयेत असा सवाल विचारला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बुलढाणा
भारत
महाराष्ट्र
Advertisement