भयानक! लोखंडी पाईपला वायर बसवून नवं हत्यार केलं, संतोष देशमुखांना मारण्यासाठी काळ्या गाडीत सामान भरलं, CID तपासात महत्वाचे पुरावे
भयानक! लोखंडी पाईपला वायर बसवून नवं हत्यार केलं, संतोष देशमुखांना मारण्यासाठी काळ्या गाडीत सामान भरलं, CID तपासात महत्वाचे पुरावे

Santosh Deshmukh Case: संरपंच संतोष देशमुख प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) ने दोषारोपपत्र सादर केल्यानंतर सोमवारी या प्रकरणातले धक्कादायक पुरावे समोर आले आणि महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करताना आनंद साजरा करणारे आरोपी, कपडे काढून लघूशंका करत बेदम मारहाण करत संतोष देशमुखांसोबत सेल्फी घेणाऱ्या आरोपीं फोटो आणि सीसीटीव्ही पुरावे समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात CID ने दाखल केलेल्या पुराव्यांमध्ये महत्त्वाचे 19 पुरावे एकट्या काळ्या चारचाकी गाडीत सापडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पियो गाडी महत्त्वाची ठरली आहे.
या काळ्या गाडीत महत्त्वाचे पुरावे
- आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडले व्हिडिओ आढळून आला.
- काळ्या काचाचे दोन गॉगल्स
- सुदर्शन घुले चे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेटही स्कार्पिओ गाडीत सापडले.
- सहा आरसी बुक सापडले
- सुदर्शन घुलचे,एटीएम कार्ड, pan कार्ड, 41 लांबीचा पाईप
- लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार
- रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर तुकडा
असा ऐवज तपासात मिळाला. या चा उल्लेख दोषारोप पत्रातही आहे.
मारहाण करतानाचे पुरावे काळ्या स्कॉर्पियोतून नेले
माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत.आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसतायत. कपडे काढून संतोष देशमुखांच्या जीव जाईपर्यंत मारले, व्हिडिओ काढला आणि आनंद साजरा केल्याचं फोटोमधून दिसून येत आहे.संतोष देशमुखांना लोखंडी रॉडने मारहाण केली.संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून, त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीसाठी नेण्यात आलेला लोखंडी पाईप, मारहाण करताना वापरलेला लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार हे महत्त्वाचे पुरावे या काळ्या स्कॉर्पियोत सापडले आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

