Sanjay Raut: विधानसभा अध्यक्ष तर सरकारच्या ताटाखालचे मांजर, संजय राऊतांची नार्वेकरांवर जहरी टीका
विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर सरकारला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय.
![Sanjay Raut: विधानसभा अध्यक्ष तर सरकारच्या ताटाखालचे मांजर, संजय राऊतांची नार्वेकरांवर जहरी टीका Sanjay Raut Slams Vidhansabha Speaker Rahul Narvekar BJP Eknath Shinde in Telangana Lok Sabha Election Maharashtra News Sanjay Raut: विधानसभा अध्यक्ष तर सरकारच्या ताटाखालचे मांजर, संजय राऊतांची नार्वेकरांवर जहरी टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/cdb1a44b138046950cc26413f3921d111690189497633359_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जोपर्यंत तुमच्या सारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजर बनून बसलेली आहे तोपर्यंत सरकार कसे पडेल? असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) प्रत्युत्तर दिले आहे. सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, असे म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत संजय राऊतांना टोला लगावला होता.
विधानसभा अध्यक्ष म्हणाले की सरकार पडणार नाही. हे तुमचं काम आहे का? सरकार पाडण्यासठी आकडा पाहिजे मग हा आकडा तुम्ही लावू नका .जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजर बनून त्या खुर्चीवर बसलेली आहे तोपर्यंत सरकार कसे पडेल? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले, बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष पदावर त्याच विचाराची व्यक्ती बसलेली आहे. बेकायदेशीर सरकारला संरक्षण देत आहे. अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून सरकारची वकिली करु शकत नाही.
बळीराजा संकटात आणि मुख्यमंत्री प्रचारात मग्न
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, तेलंगणामध्ये भाजप जिंकणार नाही. तेलंगणामध्ये लढाई काँग्रेस आणि केसीआर यांच्यामध्ये सुरू आहे. भाजप या स्पर्धेत देखील नाही. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र हे तेलंगणाच्या प्रचारामध्ये मग्न झाले आहेत. तेलंगणामध्ये तुम्हाला कोण विचारत आहे? तुम्ही राज्यात थांबा, तेलंगणामध्ये तुमच्या शिवाय निवडणुका होणार नाही का? भारतीय जनता पक्षाचा तेलंगणामध्ये पराभव निश्चित आहे.
कोण पुरुष, कोण युगपुरुष 2024 ला कळेल : राऊत
महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे महापुरूष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे युगपुरूष आहेत असं वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी केलं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 2024 नंतर कोण पुरुष आहे, कोण युगपुरुष आहे, कोण महापुरुष आहे हे कळेल. आम्ही सांगणार नाही हे जनता सांगणार आहे. महात्मा गांधीना विश्वाने मानले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये 48 प्लस जागा आम्ही जिंकणार : राऊत
लोकसभेच्या निवडणुकीविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, 2024 साली पासून जनता त्यांना सत्तेपासून लांब ठेवणार आहे.महाविकासआघाडीत कुठलेही मतभेद नाही. आम्ही एकत्र या लोकसभेत लढणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 48 प्लस जागा आम्ही जिंकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)