पुरावे असल्याशिवाय दादा भुसेंचे नाव येणार नाही, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी संजय राऊतांनी वात पेटवली
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, कसब्याचे आमदार धंगेकर, नाना पटोले या तिन्ही नेत्यांनी एकाच व्यक्तीचे नाव घेतले आहे. पुरावे असल्याशिवाय महाविकासआघडीचे नेते बोलणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : नाशिक रोडवरील (Nashik Drugs Case) शिंदे गाव एमआयडीसीमधील ड्रग्ज कारखान्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी छगन भुजबळ आणि दादा भुसेंवर (Dada Bhuse) गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्स कारखाना चालवण्यास नाशिकच्या पालकमंत्र्यांचा आशीर्वाद असून या कारखान्याच्यामार्फत त्यांना मोठी आर्थिक मदत मिळत होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पुरावे असल्याशिवाय आमचे नेते बोलणार नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, ललित पाटील या ड्रग्ज माफियाची काळजी नाशिक भागातील आमदाराने घेतली आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशिर्वादाशीवाय ड्रग्जचा कारखाना चालू शकत नाही या कारखान्यामार्फत त्यांना मोठी आर्थिक मदत मिळत होती. या सर्व प्रकरणांची चौकशी केली पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना पत्र लिहणार आहे.
पुरावे असल्याशिवाय आमचे प्रमुख नेते बोलणार नाही
ससून रूग्णालायातील ड्रग्जप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी ललित पाटील याला पळवून लावण्यात दादा भुसे यांचा हात आहे असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केली आहे.ललित पाटील शिवसेनेत प्रवेशासाठी दादा भुसेच घेऊन आले होते. यावरून देखील संजय राऊतांनी सवाल उपस्थित केला आहे. सुषमा अंधारेंनी दादा भुसेंचे नाव घेतले आहे. ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. कसब्याचे आमदार धंगेकर यांनी एकनाथ शिंदे मंत्रीमंडळातील एक मंत्री जे नाशिकचे आहे असे नाव घेतले. पुरावे असल्याशिवाय आमचे प्रमुख नेते बोलणार नाही.
दादा भुसेंची दादागिरी कधी मोडून काढणार?
ड्रग्ज माफियांना संरक्षण देण्याचे काम दादा भुसेंनी केले आहे. धाडी पडल्या त्या कारखान्याशी भुसेंचा संबंध काय? या माफियांकडून किती खोके मिळाले? दादा भुसेंची दादागिरी कधी मोडून काढणार? असा सवाल फडणवीसांना केला आहे. राजकीय विरोधकांवर फक्त ईडी, पोलिसांच्या कारवाया करणार का? असा सवाल देखील संजय राऊतांनी केली आहे. नाना पटोले, धंगेकर, अंधारेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तर द्या असे संजय राऊत म्हणाले.
ड्रग्स रॅकेट प्रकरणाला वेगळं वळण
पुण्यातील ससून (Sasoon Hospital Drug Racket) रुग्णालयातून ड्रग्स माफिया ललिल पाटील पळून गेल्यानंतर राजकीय नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या ससूनमधील ड्रग्स रॅकेट प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय ससूनमधील ड्रग्स माफिया ससूनमधून पळून जाऊ शकत नाही, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षा नाना पटोले यांनी केला आहे.