एक्स्प्लोर
Advertisement
संजय निरुपम मूर्ख माणूस : शरद पवार
कोल्हापूर: मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हा मूर्ख माणूस आहे, असा घणाघात, काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.
"संजय निरुपम हा मूर्ख माणूस, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय काम केले?
केवळ पद आहे म्हणून त्यांचे नाव आहे.
पद गेल्यावर कोण विचारतंय"
असं पवार म्हणाले.
मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती करण्यास संजय निरुपम यांनी ठाम नकार दिला. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी निरुपम यांच्यावर हल्ला चढवला. स्थानिक पातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर आनंद होईल, असंही पवार यांनी नमूद केलं. भाजपसोबत जाणाऱ्यांना खडसावलं राष्ट्रवादीत राहून भाजपासोबत जाणाऱ्या नेत्यांना शरद पवारांनी खडसावले. माजी खासदार निवेदिता माने आणि अशोक जांभळे यांना पवारांनी कानपिचक्या दिल्या. तसंच भाजप किंवा शिवसेना कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचं यावेळी पवार म्हणाले. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील नेत्यांची मुले भाजपच्या सोबत जात असल्याने शरद पवार यांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात आज सकाळी हॉटेल पंचशील इथं नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. यामध्ये माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने हे भाजप सोबत तर माजी आमदार अशोक जांभळे हे नुकत्याच झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत गेले होते,त्यामुळे निवेदिता माने आणि अशोक जांभळे याना सोबत घेऊन पवारांनी कानपिचक्या दिल्या. त्यामुळं राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. एकीकरण समितीचे सदस्य भेटीला दरम्यान, बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी आज कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी सीमावासियांच्या पाठिशी राहण्याचं आश्वासन दिलं. शिवसेनेला चिमटा यावेळी माध्यमांशी बोलताना पवारांनी पुन्हा एकदा शिवसेनेला चिमटा काढला. काडीमोड केल्यानंतरही शिवसेना भाजपसोबत सत्तेत राहिली, तर सेना सत्तेसाठी काय पण करते असा निष्कर्ष लोक काढतील, असा टोला पवारांनी लगावला. तसंच भाजप-सेनेला पाठिंबा देण्याचा विचार नसल्याचंही पवार म्हणाले.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement