एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डान्स क्लासची फी भागवण्यासाठी बाईक चोरी, तरुण अटकेत
सांगली : डान्स क्लासची फी भागवण्यासाठी बाईकची चोरी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या जतमधील कोसारी गावातील जनार्दन कांबळेने जवळपास 18 दुचाकी लंपास करुन विकल्या. त्यामधून मिळालेल्या पैशातून डान्स क्लासचा खर्च भागवत होता.
जनार्दनला बालपणीचा बूगीवूगीचं वेड जडलं. पुढे डान्स इंडिया डान्ससारख्या रिअलिटी शोचं भूत मानगुटीवर बसलं. त्याची पावलं थिरकू लागली आणि तिच पावलं मुंबईच्या दिशेने वळली.
जनार्दन मुंबईत आला. प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईसकडे डान्स शिकू लागला. पण आधीच जिथे खायची भ्रांत तिथे कसली आलीय डान्सची फी. डान्स करणंच नव्हे तर जनार्दना मुंबईत राहणंही अशक्य होऊन बसलं. जनार्दन परत आला, पण डान्सचं वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. मग शौक पूर्ण करण्यासाठी जनार्दन चोर बनला.
आधी एक बाईक चोरली, मग दुसरी चोरली. हिंमत वाढू लागली आणि गेल्या दोन वर्षात त्याने बाईक चोरण्याचा रतीब घातला. 18 हून अधिक बाईक चोरल्या आणि 9 लाख रुपये कमावले.
जनर्दन या चोरीच्या बाईक मित्रांना विकायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशातून डान्ससाठी कपडे, शूज, मेकअप साहित्य खरेदी करायचं, असा त्याचा नित्यक्रम सुरु होता. पण अखेर माशी शिंकली. कुणीतरी काडी लावली आणि जनार्दन क्राईम ब्रान्चच्या जाळ्यात अडकला.
जनार्दनकडून जप्त केलेल्या गाड्यांची किंमत जवळपास 9 लाख रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे जनार्दनच्या या चोरीने पोलिसही थक्क झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement