एक्स्प्लोर
Advertisement
सांगलीत खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला मिरज पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली : सांगलीच्या मिरजेत खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला मिरज पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलीने मिरज गांधी चौक पोलिसात तक्रार दाखल केली होती. पीडित मुलगी 15 वर्षाची असून ती सध्या नववीत शिकत आहे. सुनील करपे असे अत्याचार करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
करपेच्या खासगी क्लासमध्ये ही मुलगी शिकत होती. करपे याचे पीडित मुलीच्या घरी नेहमीचे येणे-जाणेदेखील होते. पीडित अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करुन करपेने तिच्यावर अत्याचार केले. त्यातून मुलगी गरोदर राहिली.
रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार | मुंबई | एबीपी माझा
हा प्रकार मुलीच्या कुटुबीयांच्या लक्षात आल्यानंतर पीडित मुलीने पोलिसांत तक्रार केली. करपेवर अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटकदेखील केली आहे.
सात विद्यार्थिनींवर अत्याचार, वैद्यकीय तपास अहवालात पुष्टी | चंद्रपूर | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement