एक्स्प्लोर

Sangli : आता ओटीटीद्वारे अस्सल लावण्या रसिकांसमोर येणार, 'नाद करायचा नाय' नावाचे अॅप प्रेक्षकांच्या भेटीला

Sangli : महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असलेली लावणी आता ओटीटीद्वारे रसिकांसमोर येणार आहे. प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

Sangli : अस्सल मराठमोळी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असलेली लावणी आता ओटीटीद्वारे रसिकांसमोर येणार आहे. प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजेने यासाठी पुढाकार घेतला आहे. 'नाद करायचा नाय' नावाचे अॅप प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'नाद करायचा नाय'ला सबस्क्राईब करून लावणी रसिकांनी या प्रयत्नाला ताकद द्यावी, असे आवाहन चैत्राली राजे यांनी केले आहे. 

लावणी रसिकांसाठी पोहोचवण्यासाठी हा जागतिक प्लॅटफॉर्म लावणीला तारेल आणि जुन्या रसिकांसह नवी पिढी, महिलांनादेखील तो आवडेल असा विश्‍वास  चैत्राली राजे यांना आहे. लावणी आणि लावणी कलाकार संकटात आहेत. नव्या युगाप्रमाणे लावणी बदलली नाही तर ती संपून जाईल. त्यामुळे  लावणीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेण्याचा निर्णय लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी घेतला आहे. 

कोरोना संकटाने जगाची जगण्याची शैली बदलून टाकली. मनोरंजन विश्‍वाने कूस बदलली. कित्येक बिग बजेट सिनेमे आणि मालिका ओटीटीवर आल्या आणि त्यांनी यश मिळवले. लावणी फक्त रंगमंचावरच सादर करण्याचा हट्ट धरून बसण्यात अर्थ नाही असं देखील चैत्राली राजे यांनी म्हटले आहे.  माझ्यासारख्या कलाकार ज्या अस्सल लावणीसाठी आग्रही आहेत, त्यांना तर हा बदल स्विकारून लावणीला पुढे न्यावे लागेल. त्यासाठीच हे पाऊल टाकले आहे असे चैत्राली राजे म्हणाल्या. 

रंगमंचावर प्रत्यक्ष लावणी पाहणे आणि ओटीटीवर पाहणे यात नक्कीच फरक असेल. मात्र लावणीतील तो जीवंतपणा इथेही कायम ठेवण्याचा आम्ही कसोसीने प्रयत्न केला आहे. जगभरातील रसिक त्याचा आनंद घेऊ शकतील. यात जुन्या, काळाच्या ओघात गडप होत निघालेल्य लावण्यांना मी प्राधान्य देत आहे. यात कुठेही सिनेमागीतांचा समावेश असणार नाही. बैठकीची लावणी, छक्कड, सवाल जवाब हे कुठेतरी लुप्त होत आहेत, असे वाटते. ते नव्याने जीवंत करण्याचा आनंद मी घेणार आहे. या क्षेत्रासाठीची पाऊलवाट मी तुडवणार आहे, ती नक्कीच पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वास चैत्राली राजे यांना आहे. 

थिएटरमध्ये, यात्रांमध्ये, उरुसामध्ये शो आता सुरू झाले पाहिजेत. कलाकार संकटात आहेत. राज्य शासनाने नक्कीच याचा गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन चैत्राली राजे यांनी राज्य सरकारला केले आहे. 

संबंधित बातम्या

Shehnaaz Gill : शहनाज गिलने शेअर केले टॉम अॅलिससोबत 'ल्युसिफर'चे पोस्टर, चाहत्यांना बसला सुखद धक्का

94TH OSCARS : ऑस्कर नामांकनासाठी 10 कॅटेगिरीतील चित्रपटांची नावं शॉर्टलिस्ट; जाणून घ्या कोणते चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

Zee-Sony merger : झी आणि सोनीचं विलिनीकरण, काय आहे करार?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 01 February 2025Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Embed widget