Zee-Sony merger : झी आणि सोनीचं विलिनीकरण, काय आहे करार?
Zee-Sony merger : झी (ZEEL) आणि सोनी (Sony) इंटरटेंमेंटचे विलिनीकरण करारावर स्वाक्षरी झाली आहे. कंपनीने या संदर्भात बुधवारी घोषणा केली आहे.
Zee - Sony merger : झी (ZEEL - Zee Entertainment Enterprises Ltd) आणि Sony (SPNI - Sony Pictures Networks India Private Limited) इंटरटेंमेंटच्या विलिनीकरण करारावर स्वाक्षरी झाली आहे. कंपनीने या संदर्भात बुधवारी घोषणा केली आहे. झी (Zee Entertainment Enterprises) आणि सोनी (Sony Pictures Networks India Private Limited) यांच्यातील विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. झील बोर्डाने कराराचे 90 दिवस पूर्ण होण्याआधीच स्वाक्षरी आणि विलिनीकरण करण्यास मंजूरी दिली आहे. कंपन्यांनी 22 सप्टेंबर रोजी विलिनीकरणाची घोषणा केली होती. विलिनीकरणानंतर नव्या कंपनीचं लिस्टींग होणार आहे.
झी आणि सोनी यांनी बुधवारी जाहीर केले की त्यांनी ZEEL चे SPNI मध्ये विलिनीकरण करण्यासाठी आणि त्यांचे नेटवर्क, डिजिटल मालमत्ता, उत्पादन ऑपरेशन्स आणि प्रोग्राम लायब्ररी एकत्र करण्यासाठी निश्चित करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारामध्ये विलिनीकरणानंतर, सोनी इंटरटेंमेंटकडे शेअरचा 50.86 टक्के हिस्सा असेल तर, झीकडे 45.15 टक्के हिस्सा असेल. एस्सेलचा (Essel Group) समूहाचा हिस्सा 3.99 टक्के असेल. बाकी पब्लिक शेअर होल्डर्सचा हिस्सा 45.15 टक्के असेल. विलिनीकरणानंतर पुनीत गोयंका हेच व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कायम राहतील. असणार आहेत. ZEEL ला 100 शेअर्सच्या बदल्यात 85 शेअर्स मिळणार आहेत.
झी-सोनीचा विलिनीकरण करार
एकत्रित संस्थेच्या 9 सदस्यीय मंडळात सोनीचे पाच अधिकारी असतील. मीडिया रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांमध्ये टोनी विन्सिक्वेरा, सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. यामध्ये रवी आहुजा, एरिक मोरेनो असतील. सोनीला विलीन झालेल्या संस्थेच्या बोर्डावर बहुसंख्य संचालकांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार असेल. दरम्यान, कराराचा भाग म्हणून पुनीत गोयंका पाच वर्षांच्या कालावधीसाठी विलीन झालेल्या संस्थेचे MD आणि CEO म्हणून कायम राहतील. तथापि, बोर्डाची जागा असणारा तो एकमेव ZEE कार्यकारी असेल.
इतर बातम्या :
- Bank Recruitment : कनिष्ठ अधिकारी पदाच्या 300 रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज
- Omicron in Maharashtra : अधिवेशनावर कोरोनाचं संकट, RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह
- Omicron : बिल गेट्स म्हणतात ओमायक्रॉन लवकरच संपुष्टात येईल पण...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha