एक्स्प्लोर

वसंतदादांची 'चिमुताई' गेली! दादांची नात डॉ. मधू पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasant Dada Patil)यांची नात मधू प्रकाश पाटील (Madhu Prakash Patil) यांचं काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.

Sangli News Updates : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasant Dada Patil)यांची नात मधू प्रकाश पाटील (Madhu Prakash Patil) यांचं काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. मधू पाटील यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या परिवारासह कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 44 वर्षी त्यांचं निधन झालं. 

मधू पाटील या काँग्रेसचे खासदार स्व. प्रकाश पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांच्या कन्या तर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील (Pratik Patil), काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष (Maharashtra Congress) विशाल पाटील (Vishal Patil)यांच्या भगिनी होत्या.  त्यांच्या पार्थिवावर  शनिवारी दुपारी एक वाजता पद्माळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. रात्री आठच्या सुमारास पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले.

लहानपणी त्यांच्यावर इंग्लंडमध्ये दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया 
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची त्या नात होत्या. घरातील पहिली मुलगी म्हणून वसंत दादांचा त्यांच्यावर जीव होता. त्यांना प्रेमाने चिमुताई म्हणून ओळखले जात होते. लहानपणी त्यांच्यावर इंग्लंडमध्ये दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर आणखी एकदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्यांनी जिद्दीने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. 

वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी सामान्य जनतेसाठी झटून काम

सांगलीत नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी सामान्य जनतेसाठी झटून काम केले होते. शिवाय बोगस डॉक्टर विरोधात त्यांनी सुरू केलेली मोहीमही चांगलीच गाजली होती. सध्या त्या पुणे येथे आरोग्य उपसंचालक कार्यालयात सेवेत होत्या. कोरोना काळातही त्यांनी मोठ्या हिमतीने रुग्णांना सेवा देऊन कोरोनावर मात करण्यात मदत केली होती. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक रुग्णांना उपचाराबरोबरच दिलासा देऊन बरे केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आमची घरं तोडणाऱ्यांवर कारवाई करा', पवईतील भीम नगर येथील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, SIT चौकशीची मागणी
'आमची घरं तोडणाऱ्यांवर कारवाई करा', पवईतील भीम नगर येथील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, SIT चौकशीची मागणी
SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार 
SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार 
Raghu 350 : कॉलेजचे जिवलग मित्र राजकारणात होणार वैरी? रघु 350 चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार
कॉलेजचे जिवलग मित्र राजकारणात होणार वैरी? रघु 350 चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake At Pohoradevi : लक्ष्मण हाके पोहोरादेवीत दाखल, JCB तून केली पुष्पवृष्टीSpecial Report Pune : मुलांच्या हालचालीवर डिटेक्टिव्हची नजर, अल्पवयीन मुलांवर पालकांचा 'तिसरा डोळा'Special Report Rahul Gandhi : राहुल गांधी लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी,सत्ताधाऱ्यांना कसे घेरणार ?Special Report MVA Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी मविआची विशेष रणनीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमची घरं तोडणाऱ्यांवर कारवाई करा', पवईतील भीम नगर येथील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, SIT चौकशीची मागणी
'आमची घरं तोडणाऱ्यांवर कारवाई करा', पवईतील भीम नगर येथील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, SIT चौकशीची मागणी
SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार 
SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार 
Raghu 350 : कॉलेजचे जिवलग मित्र राजकारणात होणार वैरी? रघु 350 चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार
कॉलेजचे जिवलग मित्र राजकारणात होणार वैरी? रघु 350 चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
राहुल गांधी पंतप्रधान होतील का?; आत्तापर्यंत देशातील 12 विरोधी पक्षनेत्यांपैकी 3 जण बनले पंतप्रधान
राहुल गांधी पंतप्रधान होतील का?; आत्तापर्यंत देशातील 12 विरोधी पक्षनेत्यांपैकी 3 जण बनले पंतप्रधान
कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
Rahul Gandhi : सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
Embed widget