सांगलीकरांना वीज वितरण कंपनीचा 'हाय व्होल्टेज' झटका; 600 घरांतील विद्युत उपकरणं जळून खाक
Sangli News : विजेच्या उच्च दाबामुळे सांगलीच्या गणेशनगर भागाला मोठा फटका बसला असून शेकडो घरांमधील टीव्ही, फ्रीजसारखी हजारो विद्युत उपकरणं खाक झाली आहेत.
Sangli News : दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय सध्या सांगलीकर घेत आहेत. एकीकडे महागाईनं डोकं वर काढलंय आणि दुसरीकडे वीजबिलही जास्त येत आहे. त्यातच सांगलीतल्या गणेशनगर भागातील जवळपास 600 घरांना विजेच्या उच्च दाबामुळे मोठा फटका बसला आहे. घरातील टीव्ही, फ्रीज अशी विद्युत उपकरणं जळून खाक झाली आहेत. कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या या कुटुंबांना आता घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त अथवा नवीन आणण्याची वेळ आली आहे. नुकसानाचा आकडा देखील मोठा असल्यानं महावितरणकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा या सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सांगलीमध्ये विजेच्या उच्च दाबामुळं 600 भर घरातील टीव्ही, फ्रीज असे हजारो विद्युत उपकरण जळून खाक झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. सांगलीच्या गणेशनगर भागामध्ये ही घटना घडली असून वीज वितरण कंपनीकडून नुकसान पंचनामे सुरु करण्यात आलं आहे. मात्र ऐन सणासुदीच्या काळात वीज वितरण कंपनीच्या झटक्यानं ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहे.
सांगलीच्या गणेशनगरमध्ये वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामूळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुपारच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढला, त्यामुळे शेकडो घरातील टीव्ही, फ्रीज ,मोबाईल अश्या विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. अचानक पणे एकाच वेळी तब्बल 500 ते 600 ग्राहकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले.यावेळी या प्रभागाचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि एमएसीबीच्या अधिकाऱ्याना बोलवून सदर घटना निदर्शनास आणून देत तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली त्यानंतर वीज वितरण विभागाकडून नुकसान झालेल्या ग्राहकांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :