एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या

गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांत निवडणुकीचा ज्वर वाढला होता. महापालिकेची ही पाचवी सार्वत्रिक निवडणूक असून एक ऑगस्ट रोजी मतदान होत आहे.

सांगली : सांगली महापालिका निवडणुकीसाठी गेल्या महिन्यापासून धडधडत असलेल्या राजकीय तोफा सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड झाल्या. गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांत निवडणुकीचा ज्वर वाढला होता. महापालिकेची ही पाचवी सार्वत्रिक निवडणूक असून एक ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. सांगलीसोबतच जळगाव महापालिकेसाठीही एक ऑगस्टलाच मतदान होत आहे. एकूण 20 प्रभागांतील 78 जागांसाठी 541 उमेदवार रिंगणात आहेत. यंदा 18 प्रभागातून प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांतून प्रत्येकी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आज शक्ती प्रदर्शन करत शहरातून पदयात्रा रॅली काढली. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेसने यंदा राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. भाजपला महापालिकेत सत्तेत येऊ न देणे हा या आघाडीने चंग बांधलाय. भाजपने पोलीस बळाचा वापर केला : जयंत पाटील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला पुन्हा एकदा महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळेल, असा विश्वास काँगेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुकीत भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांनी पोलिसांच्या बळाचा वापर करून आघाडीच्या उमेदवारांना धमकावत असल्याचा आरोप केला. याशिवाय ईव्हीएम यंत्राची तपासणी करावी, यंत्र नीट काम करतात का नाही याची तपासणी पारदर्शी करावी, अशा सूचना निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या असल्याचं ते म्हणाले. भाजपचा निर्विवाद विजयाचा दावा पहिल्यांदाच मोठ्या ताकदीने सांगली महापालिका निवडणूक लढवणाऱ्या भाजपने या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. सांगलीकर जनता ही काँग्रेसला कंटाळली आहे. अनेक वर्षे काँग्रेसने सत्ता भोगली, मात्र म्हणावा तसा विकास या शहराचा झाला नाही. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि भाजपची सत्ता सांगली महापालिकेवर येईल आणि महापौर भाजपचाच होईल, असं दावा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी छातीठोकपणे केला. भाजपप्रमाणे शिवसेनाही ही निवडणूक पहिल्यांदाच मोठ्या ताकदीने लढवत आहे. शिवसेना निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरली आहे. ही निवडणूक त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. मात्र अचंबित करणारा निकाल हाती येईल आणि शिवसेना सत्ता काबीज करेल, असा आशावाद शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला. महापालिकेची ही निवडणूक आगामी लोकसभा, विधानसभेची तालीम असल्याने सर्वच पक्ष महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्षानुवर्षे ताब्यात असेलेली महापालिका भाजपला आपल्या ताब्यात घ्यायचीय, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेनंतर पहिल्यांदाच ताब्यात घेतल्यानंतर भाजपची नजर आता महापालिकेवर आहे. 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात काँग्रेस – 44, राष्ट्रवादी - 34 भाजप - 78 शिवसेना - 56 अपक्ष विकास महाआघाडी - 43 स्वाभिमानी विकास आघाडी - 20 सांगली जिल्हा सुधार समिती - 21 एमआयएम - 8
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget