एक्स्प्लोर
Advertisement
सांगली महापालिका आयुक्तांना जिवंतपणी श्रद्धांजली
या संपुर्ण प्रकारामुळे सांगली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोस्ट टाकणाऱ्या आयुब पटेल यांच्यावर कारवाईसाठी महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी रात्री उशिरा शहर पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दिली आहे. मध्यरात्रीपर्यंत मनपा अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता.
सांगली: सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याबाबत श्रद्धांजलीची फेसबुकवर पोस्ट टाकल्याने सांगलीत खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महापालिका अधिकारी कर्मचारी संतप्त झाले आहेत. या चुकीच्या पोस्टचा निषेध व पोस्ट टाकणाऱ्याला अटक करण्याच्या मागणीसाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी ही पोस्ट टाकली आहे. आयुक्तांसह महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाही श्रद्धांजली वाहण्याची ही पोस्ट आहे. "आयुक्त यांना श्रद्धांजली वाहणेसाठी सर्वांनी आज 4 वाजता यावे, तसेच वॉर्ड क्रमांक 12 मधील सर्व स्वच्छता कर्मचारी यांचे निधन झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचा मजकूर आयुब पटेल यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
या संपुर्ण प्रकारामुळे सांगली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोस्ट टाकणाऱ्या आयुब पटेल यांच्यावर कारवाईसाठी महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी रात्री उशिरा शहर पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दिली आहे. मध्यरात्रीपर्यंत मनपा अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता.
पोस्टच्या निषेधार्थ सांगली महापालिका कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले असून शहरातील सर्व स्वच्छता कर्मचारी सकाळपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. याबाबत शहर पोलिसात महापालिकेच्या वतीने उपायुक्त स्मृती पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement