एक्स्प्लोर
Advertisement
लग्नाचे आमिष दाखवत नशेच्या गोळ्या देऊन तरुणीसोबत शरीरसंबंध, अहमदनगरचा तरुण अटकेत
"आरोपी तरुणाने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवलं होतं. तसंच नशेच्या गोळ्या देऊन शरीरसंबंध ठेवले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले," अशी तक्रार तरुणीने सांगली शहर पोलिसात दिली आहे.
सांगली : एका 22 वर्षीय तरुणीला लग्नाचं आमिष देऊन, नशेच्या गोळ्या देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवत, ते फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे.
अजय उर्फ अविनाश संजय पवार असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर बदनामी, फसवणूक, बलात्कार असे गुन्हे सांगली शहर पोलिसांनी दाखल केले आहेत.
"आरोपी तरुणाने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवलं होतं. तसंच नशेच्या गोळ्या देऊन शरीरसंबंध ठेवले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले," अशी तक्रार तरुणीने सांगली शहर पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी अविनाश पवारला अहमदनगरमधून अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement