(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : जयंत पाटील खरे खलनायक, विशाल पाटलांना काँग्रेसचं तिकीट न मिळण्यामागे त्यांचाच हात, भाजपच्या माजी आमदाराचा आरोप
सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळण्यामागच्या खेळीतील खरा खलनायक हा जयंत पाटील आहे. संजय राऊत यांच्याद्वारे जयंत पाटील यांनी खेळी खेळत्याची टीका विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत केली आहे.
सांगली : सांगली लोकसभेच्या महाविकास (Sangali Loksabha Constituency) आघाडीच्या जागेची चांगलीच चर्चा रंगली. यातच आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगलीच्या जागेवरुन जयंत पाटील (Jayant Patil ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळण्यामागच्या खेळीतील खरा खलनायक हा जयंत पाटील आहे. संजय राऊत यांच्याद्वारे जयंत पाटील यांनी खेळी खेळत्याची टीका विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत केली आहे.
विलासराव जगताप नेमकं काय म्हणाले?
वसंतदादा यांच्या नातवाला तिकीट मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. ही दुःखद घटना आहे. हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे. या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटील आहेत. संजय राऊत यांच्या द्वारे जयंत पाटील यांनी ही खेळी खेळली असा घणाघाती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वसंतदादा यांचे नव्वद वर्षातील काँग्रेसमधील योगदान पाहून वरिष्ठ मंडळींनी विशाल यांना तिकिटासाठी महाराष्ट्र, दिल्लीचे खेटे लावायला नको होते. एकेकाळी सांगलीतून तिकीट ठरवलं जायचं.शिवाय, ज्या शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य नाही. अशा व्यक्तीला तिकीट देऊन त्यासाठी आग्रह धरला. यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल यांच्या विरोधात षडयंत्र रचलं, असेही श्री. जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासह जगताप गटातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली लोकसभा मतदार संघाची यंदा चांगलीच चर्चा रंगली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात शरद पवारांनी पैलवान असलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि विशाल पाटील यांनी बंड पुकारलं. त्यानंतर त्यांनी प्रचारसभेलादेखील सुरुवात केली आहे. या प्रचारसभेदरम्यान आता अनेक जणांवर टीका केली जात आहे. विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे स्थानिक आमदार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या हितासाठी पाटील यांनी माघार घ्यावी, असे म्हटले होते. मात्र तरीरी सांगली लोकसभा लढवण्यासाठी विशाल पाटील ठाम आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदावार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात ही तिरंगी लढत होत आहे.
इतर महत्वाची बातमी-