एक्स्प्लोर
Advertisement
Lock down | सांगलीतलं इस्लामपूर संपूर्ण लॉकडाऊन, तीन दिवस दूध, भाजीपालाही मिळणार नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात वाढत आहे. याचा फटका सांगलीला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सांगलीत 24 कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून प्रशासन सतर्क झाले आहे.
सांगली : इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधित कुटुंबियांच्या संपर्कात शहरातील 337 नागरिक आल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी इस्लामपूर शहर आज, रविवार 29 मार्च पासून 31 मार्च अखेर पूर्णतः लॉकडाउन करण्याचा निर्णय नगरपालिका सभागृह झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. या कालावधीत फक्त मेडिकल स्टोअर्स एक दिवसाआड सुरू राहणार असून दूध, भाजीपाला, किराणा दुकानंही बंद राहणार आहेत.
शहरातील बँका, पतसंस्थांनीही लॉकडाउनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य गरज ओळखून इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करण्यासाठी आणखी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. 4 हजार लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवली जात आहे. दुबार करावे लागले तरीही सर्व्हे केली जाणार. बफर झोनमध्ये असणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारले जातील आणि त्याना, पुढील तीन महिने बाहेर पडता येणार नाही अशा पद्धतीचे नियोजन केले जात आहे.
याशिवाय अत्यावश्यक बाब असलेले मेडिकल विषम तारखेला सुरू राहतील. मेडिकल सुरू न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांचे परवाने रद्द केले जातील. कोरोनाबधित लोकांच्या जवळपास 400 लोक संपर्कात आले आहेत. कोरोनाबाधित राहत असलेला शहरातील साडेतीन किलोमीटर अंतराचा परिसर सील करण्यात आला आहे. यात 11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे. 27 इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत. याशिवाय येत्या तीन दिवसात इस्लामपूर शहराच्या व शहरातील प्रभागांच्या सीमा बंदिस्त केल्या जाणार आहेत.
भयमुक्त करण्यासाठी लावले स्पीकरवरून भजन
इस्लामपूरमध्ये कोरोनाचे 24 रुग्ण आढळल्यानंतर तेथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे या घाबरलेल्या नागरिकांसाठी इस्लामपूरच्या गांधी चौकात ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण आढळले त्या ठिकाणी लोकांना प्रेरणा यावी म्हणून स्पिकर वरुन भजन वाजवले जात आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध भजने आणि देव देवतांची प्रेरणा गीते वाजवून नागरिकाच्यात असणारी भीती कमी केली जात आहे.
सांगली जिल्ह्यात तीन सदस्यीय समिती
सांगली जिल्ह्यात येथे कोरोना रुग्ण जास्त आढळल्याने तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. जेजे हॉस्पीटलच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. ही तीन सदस्यीय समिती सांगलीमध्येच राहून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
सांगलीमध्ये 24 वर कोरोनाबाधित
सांगलीमधील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सांगली येथे आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.सगळे सांगलीतील करून रुग्णांचा आकडा 24 वर पोहोचला आहे.त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement