एक्स्प्लोर

सांगलीसह रायगडमध्ये लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई, दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं  

सांगलीचे समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे (Nitin Ubale)  यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.

Sangli : सांगलीचे समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे (Nitin Ubale)  यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. कार्यालयातील कक्षातच लाच घेत असताना उबाळे लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले. बचत गटाने घेतलेल्या निविदेचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात ते 40 हजाराची लाच घेत असताना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांना लाच  लुचपत विभागाने अटक केली. 

लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून केली अटक

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे बचत गटाच्या निविदेनुसार 8 लाख 12 हजार रुपये देयक मंजुरीसाठी 10 टक्के लाचेची मागणी उबाळे यांनी केली होती. याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची नियमानुसार पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 80 हजाराची लाच मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीमध्ये ही 5 टक्के प्रमाणे 40 हजार रुपये ठरले. गुरुवारी समाज कल्याण विभागाच्या  कार्यालयात लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. सहायक आयुक्त उबाळे कार्यालयाच्या प्रधान कक्षामध्येच 40 हजार रुपयांची लाच घेत असताना पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहात अटक केले. भ्रष्टाचार प्रतिबंधक  कायद्यानुसार उबाळे यांच्या विरुध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रायगडमधील म्हसळामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

रायगडमधील म्हसळामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. जमिनीच्या मोजनीकरीता आकारफोड करुन देण्याकरता भुकरमापक सर्वेअरकडून 50000 हजाराच्या लाचेची मागणी शेतकऱ्याकडे केली होती. विशाल भीमा रसाळ असं लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अलिबाग मधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं विशाल भीमा रसाळ या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पडकडलं आहे. माणगाव येथील बस स्थानकात लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली आहे. 

अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात लाच घेण्याचे प्रकार वाढले

अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात लाच घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी हे प्रकार घडत आहे. यावर प्रशासन कारवाई देखील करताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी करत मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याचे अनेक प्रकार अलिकडे उघडकीस आल्याचटे पाहायला मिळाले. 

महत्वाच्या बातम्या:

धुळ्यात देशी दारूच्या दुकानासाठी वीजचाेरी करताच इसमानं डाव साधला, 30 हजाराची लाच घेतली पण झालं भलतंच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget