एक्स्प्लोर

सांगलीत आमदार, खासदारांपासून प्रशासकीय अधिकारीही कोरोनाच्या विळख्यात; आतापर्यंत अनेकांची कोरोनावर मात

सांगलीमधील अनेक आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेकांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली आहे.

सांगली : सांगली मधील आमदार, खासदारांपासून प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचे रुग्ण आढळू लागले असले तरी ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांचा जिल्ह्यातील आकडा वाढला. यात सर्वसामान्य जनतेबरोबरच राजकारणी, अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यातील काहीजणांनी कोरोनावर मात करून पुन्हा कामास सुरुवात देखील केली आहे.

सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. प्राथमिक लक्षणे दिसल्याने खासदार पाटील यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली होती. सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पाटील यांची प्रकृती उत्तम असल्याने घरीच त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. खासदार पाटील हे गेल्या महिन्यापासून अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होते, दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्याने खासदार पाटील यांनी कोरोना चाचणी केली होती. सोमवारी रात्री त्यांचा आहवला पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोणताच त्रास जाणवत नसल्याने त्यांनी घरीच क्वॉरंटाईन होत, उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच खासदार पाटील यांनी आपली प्रकृती उत्तम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लक्षणं असल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी ,असे आवाहन केले आहे.

भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईला अधिवेशनासाठी गेले असताना विधानभवन मध्ये घेण्यात आलेल्या आमदाराच्या टेस्ट मध्ये पडळकर यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यामुळे पडळकर अधिवेशनात उपस्थित न राहता ते तातडीने सांगली जिल्ह्यातील आटपाडी मधील झरे या गावी येऊन क्वारनटाइन झाले आहेत. त्याना कोणताही त्रास जाणवत नसून तरी देखील खबरदारी म्हणून घरीच उपचार घेत असल्याची माहिती पडळकर यांनी दिलीय. याशिवाय काँगेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी देखील कोरोनावर मात केली आहे.

विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर हे देखील कोरोना पॉझिटीव्ह होते. तासगावच्या आमदार सुमनताई आर. आर. पाटील, खानापूर-आटपाडीचे मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर, आमदार मोहनराव कदम, जत मतदारसंघाचे काँगेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा यात समावेश आहे. तर सर्वांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर. आर. पाटील आणि आर. आर आबा यांचे बंधू सुरेश पाटील या दोघांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता. पण शनिवारी पुन्हा तपासणी करण्यात आली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिघांची प्रकृती उत्तम असून सर्व जण पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा सुद्धा कोरोना बाधित झाले आहेत. शर्मा यांना त्रास जाणवत होता, त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. शर्मा यांचा अहवाल पॉझिटिव आला तर शर्मा यांची प्रकृती स्थिर असून ते होम क्वॉरंटाईन झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत.

कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागण

माजी मंत्री, आमदाराची कोरोनावर मात

काही दिवसांपूर्वी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसात घरीच उपचार घेऊन खोत यांनी कोरोनावर मात केली आणि सदाभाऊनी पावसाळी अधिवेशनाला देखील हजेरी लावली आहे.

दुसरीकडे सांगली विधानसभा आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ , सुरेश खाडे यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी देखील कोरोनावर मात केली मात्र खबरदारी म्हणून दोघांनीही अधिवेशनाला हजेरी लावली नाही. आमदार मोहनराव कदम यानी देखील कोरोनावर मात केलीय.

महत्त्वाच्या बातम्या : 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोना, घरातच विलगीकरण

आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget