आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला
आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करुन दिली आहे. मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
नवी दिल्ली : आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालंय. श्रीपाद नाईक यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. नाईक मोदी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत ज्यांना COVID 19 चं संक्रमण झालं आहे. याअगोदर गृहमंत्री अमित शाह आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे दोन्ही नेते रुग्णलयात भरती आहेत. दरम्यान, लक्षणं नसल्याने नाईक यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.
I underwent Covid-19 test today & it has turned out assymptomaically positive. My vitals are within normal limits and I have opted for home isolation. Those who have came in contact with me in last few days are advised to get tested for themselves and take required precautions.
— Shripad Y. Naik (@shripadynaik) August 12, 2020
नाईक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की, "मी आज COVID -19 ची चाचणी केली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणताही त्रास नाही त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे." ते म्हणाले की, ''जे लोक मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी"
मोदी सरकार मधील तीन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील आतापर्यंत तीन मंत्र्यांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली आहे. यात सर्वात अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यांनंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोना व्हायरसचं संक्रमण झाले आणि आता आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी ट्वीट करुन सांगितले.
PM Modi | कोरोनाच्या लढाईत दहा राज्य जिंकली तर देश जिंकेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती