एक्स्प्लोर

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोना, घरातच विलगीकरण

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. आपण जरी कोरोनाबाधित असलो, तरी घरात राहून काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. आपण जरी कोरोनाबाधित असलो, तरी घरात राहून काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आजपासून गोव्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच राज्यातील आणि बार, रेस्टॉरंटदेखील खुली करण्यात आली आहेत. प्रमोद सावंत यांनीच सोमवारी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनुसार कालपासून राज्याच्या नव्या सीमा खुल्या झाल्या आहेत. सर्व वाहनांना गोव्यामध्ये प्रवेश दिला जाणार असून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आज मुख्यमंत्री सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, मला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नसून घरातच विलगीकरणात राहत आहे. सध्या मी घरातूनच काम करत आहे. माझ्या जवळच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी'.

आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला

याआधी उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती. श्रीपाद नाईक यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली होती. तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांना देखील गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना देखील डॉक्टरांनी होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. तसेच, या पूर्वी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफसियो डायस, आमदार सुदिन ढवळीकर, आमदार चर्चिल आलेमांव यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
UP Assembly Election : उत्तर प्रदेश निवडणुकीचा पहिला मोठा सर्व्हे समोर! अखिलेश यादवांसाठी खूशखबर की भाजपची धाकधूक वाढली? मतांचं अंतर निसटतं, सत्तेचं पारडं कुणाकडे? 
उत्तर प्रदेश निवडणुकीचा पहिला मोठा सर्व्हे समोर! अखिलेश यादवांसाठी खूशखबर की भाजपची धाकधूक वाढणार? मतांचं अंतर निसटतं, सत्तेचं पारडं कुणाकडे? 
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget