एक्स्प्लोर
शरद कोळी हल्ल्यामागे भाजपच्या 'सरजी'चा हात?

सोलापूर : माहिती अधिकार कार्यकर्ते शरद कोळी हल्ल्याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण भाजपचा जिल्हा परिषद उमेदवार आणि वाळू माफिया गोपाळ अंकुशराववर या हल्ल्याचा आरोप आहे. शरद कोळी यांनी गोपाळ अंकुशराव विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी 1 हजार कोटीच्या दंडाची मागणी त्यांनी केली होती. याच प्रकरणातून अंकुशरावने हा हल्ला केल्याचा आरोप आहे.
विरोधकचा अर्ज पळवला गोपाळ अंकुशराव भाजपच्या तिकिटावर बिनविरोध विजयाच्या मार्गावर आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळविण्याच्या धुंदीत, बेफाम झालेल्या भाजपने, रोज राज्यभरातील गुंडांची फौज पक्षात सामील करुन घेण्याचा सपाटा लावला आहे. गोपाळ बाजीराव अंकुशराव हा असाच एक गुंड आता सोलापूर जिल्हा परिषदेत बिनविरोध निवडून येण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या विरोधातील एका महिलेचा अर्जच पळवून नेल्याची तक्रार पुढे आली आहे. परिचारक गटाकडून भाजपचे तिकीट पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर हा जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. यातून निवडणूक लढविण्यासाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र फारच कमी लोकांकडे आहे. स्वच्छ प्रतिमा म्हणून राज्यात ओळख असलेल्या परिचारक गटाकडून गोपाळ अंकुशरावला भाजपचे तिकीट देण्यात आले. पूर्वाश्रमी शिक्षक गोपाळ अंकुशराव पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी करत होता. तो काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीच्या विश्वात ओढला गेला. अलीकडच्या काळात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली परिसरात कुख्यात गुंड 'सरजी' अशी त्याची ख्याती आहे. खून, मारामाऱ्या यांसह अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. काळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूच्या व्यवसायात तर सरजी हे परवलीचे नाव ठरले आहे. अशा बदनाम गुंडाला परिचारिकांनी भाजपचे तिकीट देऊन पवित्र केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने, गोपाळपूर मतदारसंघात 'सरजी'ची बिनविरोध निश्चित झाली आहे. या 'सरजी'मुळे भाजपाचा सोलापूर जिल्हा परिषदेत जरी पहिला विजय मिळाला असला, तरी उठता बसता पारदर्शकता आणि नितीमत्तेच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचा खरा चेहरा मात्र यामुळे राज्यासमोर आला आहे. संबंधित बातमी
पोलिस संरक्षणात RTI कार्यकर्ते शरद कोळींवर जीवघेणा हल्ला
कोण आहे गोपाळ अंकुशराव? खून, खुनाचा प्रयत्न, वाळूमाफिया असे अनेक आरोप असलेला आरोपी म्हणजे गोपाळ अंकुशराव अर्थात सरजी होय. 'सरजी'ची जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून राजकीय पटलावर एण्ट्री झाली आहे. धक्कादायक म्हणजे अंकुशरावने आपल्या विरोधात कोणताच उमेदवार उभा राहू नये याची व्यवस्थित तडजोड केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अंकुशराव आपसूकच बिनविरोध निवडून येणार आहे.
विरोधकचा अर्ज पळवला गोपाळ अंकुशराव भाजपच्या तिकिटावर बिनविरोध विजयाच्या मार्गावर आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळविण्याच्या धुंदीत, बेफाम झालेल्या भाजपने, रोज राज्यभरातील गुंडांची फौज पक्षात सामील करुन घेण्याचा सपाटा लावला आहे. गोपाळ बाजीराव अंकुशराव हा असाच एक गुंड आता सोलापूर जिल्हा परिषदेत बिनविरोध निवडून येण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या विरोधातील एका महिलेचा अर्जच पळवून नेल्याची तक्रार पुढे आली आहे. परिचारक गटाकडून भाजपचे तिकीट पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर हा जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. यातून निवडणूक लढविण्यासाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र फारच कमी लोकांकडे आहे. स्वच्छ प्रतिमा म्हणून राज्यात ओळख असलेल्या परिचारक गटाकडून गोपाळ अंकुशरावला भाजपचे तिकीट देण्यात आले. पूर्वाश्रमी शिक्षक गोपाळ अंकुशराव पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी करत होता. तो काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीच्या विश्वात ओढला गेला. अलीकडच्या काळात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली परिसरात कुख्यात गुंड 'सरजी' अशी त्याची ख्याती आहे. खून, मारामाऱ्या यांसह अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. काळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूच्या व्यवसायात तर सरजी हे परवलीचे नाव ठरले आहे. अशा बदनाम गुंडाला परिचारिकांनी भाजपचे तिकीट देऊन पवित्र केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने, गोपाळपूर मतदारसंघात 'सरजी'ची बिनविरोध निश्चित झाली आहे. या 'सरजी'मुळे भाजपाचा सोलापूर जिल्हा परिषदेत जरी पहिला विजय मिळाला असला, तरी उठता बसता पारदर्शकता आणि नितीमत्तेच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचा खरा चेहरा मात्र यामुळे राज्यासमोर आला आहे. संबंधित बातमी पोलिस संरक्षणात RTI कार्यकर्ते शरद कोळींवर जीवघेणा हल्ला
आणखी वाचा























