(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नजर हटी, दुर्घटना घटी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागल्याने तीन जणांचा मृत्यू
चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.
Samrudhhi Highway Accident : समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway Accident) पहाटे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. महामार्ग सुरू झाल्यापसून अनेक छोटे मोठे अपघात झाला आहे. सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री झाले आहे. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे.
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार
चालकाला पहाटे झोप लागल्याने धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल 128 वर हा अपघात आहे. यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या संदर्भात अधिक तपास सद्या तळेगाव दशासर पोलीस करत आहेत. समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत असतो तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे (Accident) मात्र आता समृद्धी महामार्ग सुरक्षितपणे वाहने चालवून वाहनचालक मोठ्या प्रमाणात वापरताना दिसत आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात पहाटे किंवा मध्यरात्री
समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात हे पहाटे किंवा मध्यरात्री झाले आहे. अपघातांच्या मालिकेनंतर समृद्धीवर प्रवास करायचा की नाही असा प्रश्न आता पडत आहे. या महामार्गावर जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झालेअसून त्यामध्ये जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे. समृद्धी महामार्ग हा जरी राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग असला तरी मात्र यावरील होणाऱ्या अपघाताच प्रमाण बघता आता तरी सरकारने जागे होणे आवश्यक आहे.
हे ही वाचा :